शिवसेनेने आता फक्त हिरवा झेंडाच खांद्यावर घेणं बाकी आहे; भाजपची खोचक टीका

शिवसेनेने मुस्लिम समाजातील लहान मुलांसाठी अजान पठण स्पर्धेचं आयोजन करण्याची घोषणा करताच त्यावर भाजपकडून टीका करण्यात येत आहे. (atul bhatkhalkar criticized shivsena’s azan competition)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:32 PM, 30 Nov 2020

मुंबई: शिवसेनेने मुस्लिम समाजातील लहान मुलांसाठी अजान पठण स्पर्धेचं आयोजन करण्याची घोषणा करताच त्यावर भाजपकडून टीका करण्यात येत आहे. शिवसेनेने आता खांद्यावर हिरवा झेंडा घेणंच बाकीय उरलंय, अशी खोचक टीका भाजप नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. (atul bhatkhalkar criticized shivsena’s azan competition)

अतुल भातखळकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना ही टीका केली आहे. शिवसेनेने हिंदुत्व कधीच सोडून दिलं आहे. त्यांचं हिंदुत्व केवळ नावाला आहे. आता तर अजान पठणाची स्पर्धा त्यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांनी केवळ हिरवा झेंडा खांद्यावर घेणंच तेवढं बाकी राहिलं आहे, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे. आम्ही अजान आणि मशिदीवरील भोंग्यांना नेहमीच विरोध केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही मशिदीवरील भोंग्यांना विरोध केलेला आहे. मात्र, शिवसेनेला आता या गोष्टीचा विसर पडला आहे. त्यांचं हेच नवं ज्वलंत हिंदुत्व आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

त्यांना राजकारण करण्याची सवय

दरम्यान, अजानच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपवर शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी टीका केली आहे. राजकारण करणाऱ्यांना राजकारण करायचंच असतं. आम्ही कोणताही शब्द वापरला तरी ते राजकारण करतात. हिंदू-मुस्लिमांवर राजकारण करण्याची त्यांची जुनीच सवय. ही सवय जाणार नाही, असं सांगतानाच आमचा हेतू शुद्ध आहे. त्यामुळे आम्ही त्याकडे लक्ष देत नाही, असं सकपाळ म्हणाले. (atul bhatkhalkar criticized shivsena’s azan competition)

प्रत्येकाला आपला धर्म प्यारा असतो. त्यावर आमचा विश्वास आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही देशप्रेमी मुस्लिमांची नेहमीच कदर केली आहे. एवढंच नव्हे तर एका मुस्लिम जोडप्याला त्यांनी ‘मातोश्री’त नमाज पठण करण्याची परवानगीही दिली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. शिवसेनेचे काही मुस्लिम पदाधिकारी माझ्याकडे आले होते. कोरोनाची परिस्थिीती असतानाही लहान मुलं घराबाहेर पडत आहे. ते घरात थांबत नाही. त्यांच्यासाठी काही तरी करण्याची गरज या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. त्यावेळी हिंदू धर्मियांसाठी जसं भगवदगीता पठण स्पर्धेचं आयोजन केलं जातं, तसं मुस्लिम मुलांसाठी अजान पठण स्पर्धेचं ऑनलाईन आयोजन करण्याचा सल्ला मी त्यांना दिला. केवळ लहान मुलांच्यासाठी सांगितलेला हा उपाय होता, असंही ते म्हणाले. (atul bhatkhalkar criticized shivsena’s azan competition)

 

संबंधित बातम्या:

लहान मुलांसाठी शिवसेनेची अजान स्पर्धा, अजानला विरोध करणं गैर: पांडुरंग सकपाळ

तुमच्या डोळ्याला आणि कानाला त्रास व्हावा म्हणूनच माझी नियुक्ती; राऊतांचा चंद्रकांतदादांना टोला

तीन पक्षांनी एकत्र यावं ही माझी 2014 पासूनची इच्छा, पण तेव्हा पवारांनी जनमताचा विचार केला : नवाब मलिक

(atul bhatkhalkar criticized shivsena’s azan competition)