कौआ हंस की चाल नहीं चल सकता; आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंना टोला

कोस्टल रोडसाठी काम करणाऱ्या इंजिनिअर्सची उपलब्धताच नाही. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळाची गरज लक्षात घेता इतर ठिकाणाहून मनुष्यबळ आणण्याचा निर्णय घेण्यात आला.

कौआ हंस की चाल नहीं चल सकता; आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंना टोला
Image Credit source: tv9 marathi
भीमराव गवळी

|

Sep 24, 2022 | 5:08 PM

मुंबई: भाजप नेते आशिष शेलार (ashish shelar) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर पलटवार केला आहे. अमित शहांना आव्हान देण्याऐवजी उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावं. त्यांनी आरसा घेऊन उभं राहण्याची गरज आहे. आपण ज्यांना आव्हान देतोयत त्यांच्या ताकदीसमोर आपण कुठे उभे आहोत, हे त्यांना कळेल. स्वतःच्या हिंमतीवर तुम्ही एकदातरी महाराष्ट्रात सरकार आणले आहे का? तुम्ही शिवसेनेचे (shivsena) 100 आमदार तरी निवडून आणले आहेत का? 100 सोडाच पण 75 चा आकडा तरी कधी पार केला आहे का? असा सवालच आशिष शेलार यांनी केला आहे. ज्या शहांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एकदा नाही तर दोनदा शंभर आमदार निवडून आणले, त्यांना तुम्ही आव्हान देतात. म्हणजेच सूर्यावर थुंकण्यासारखे असल्याचे सांगत कौआ हंस की चाल नहीं चल सकता, अशी टीकाही शेलार यांनी केली आहे.

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. PFI प्रकरणात पुण्यात जी घोषणाबाजी झाली, त्या वर्तणुकीला ठेचून काढलं पाहीजे, अशी आमची भाजपाच्यावतीने गृहमंत्र्यांकडे मागणी आहे. ते देखील या मागणीप्रमाणे निर्णय घेतली, अशी अपेक्षा आहे. PFI वर जी कारवाई केंद्रीय यंत्रणांनी केली आहे, ती योग्यच आहे. ज्यापद्धतीने या देशात देशविघातक वातावरण निर्माण करण्याचे जाळे विणले जाते, त्याविरोधात हा लढा आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

ज्या ज्या वेळी देश बलवान होतो, त्यावेळी देश विघातक शक्ती स्वतःची नखं दाखविण्याचे प्रयत्न करतात. आम्हाला आनंद आहे की, केंद्र सरकारने यांना उखडून टाकण्याचे ठरविले आहे. या कारवाईला आमचे समर्थन आहे. पटना असो किंवा मोदीजींची सभा असो.. मोदींजींना लक्ष्य करणारे बोलणारे सगळेच कधी कधी देशाच्या स्वाभिमानाचा त्यांना विसर पडतो, असंही त्यांनी सांगितलं.

काल परवा हजार – दोन हजार लोकांसमोर एनएसईमध्ये उद्धवजी ठाकरे यांनी एकपात्री प्रयोग केला. त्या सभेत पीएफआय किंवा तत्सम दहशतवादी इस्लामी संघटनांवर बोलण्याचे त्यांनी का टाळले? याचे उत्तर ते देतील का? असा सवालही त्यांनी केला.

कोस्टल रोडसाठी चेन्नईमध्ये मुलाखती घेण्यात आल्या, हे देखील खोटे आहे. आदित्य ठाकरे यांनी सध्या चहा ऐवजी इतर पेय घ्यायचे ठरविलेले दिसते. ते पेय योग्य आणि सुविधाजनक असेल अशी माझी त्यांना विनंती आहे. एवढे खोटे बोलण्याची गरजच नाही. 1 हजार 725 लोक मुंबईतील सहा वेगवेगळ्या ठिकाणी कोस्टल बाजूवर काम करण्याची क्षमता असलेले इथेच भरती झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

कोस्टल रोडसाठी काम करणाऱ्या इंजिनिअर्सची उपलब्धताच नाही. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळाची गरज लक्षात घेता इतर ठिकाणाहून मनुष्यबळ आणण्याचा निर्णय घेण्यात आला. आदित्य ठाकरे वांद्रे – वर्सोवा पुढे बोरीवली-विरार पर्यंतच्या कोस्टल रोडला ते थांबवू पाहत आहेत. आदित्य ठाकरे प्रकल्पविरोधी आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें