AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता सत्तेवर आलात, भविष्यात जनता दारात उभं करणार नाही, OBC आरक्षणावरुन पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारवर घणाघात

सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय. सरकारने फक्त 15 महिने गोल गोल फिरवलं, कुठलाही डाटा कोर्टात जमा केला नाही, अशी घणाघाती टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर केली. त्या पुण्यात बोलत होत्या. (BJP Pankaja Munde Attacked on thackeray Government Over OBC Reservation in Pune)

आता सत्तेवर आलात, भविष्यात जनता दारात उभं करणार नाही, OBC आरक्षणावरुन पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारवर घणाघात
पंकजा मुंडे, उद्धव ठाकरे आणि अजित पवार
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Jun 26, 2021 | 12:20 PM
Share

पुणे : एवढं छोटा मन ठेवून तुम्ही मोठं होऊ शकत नाही. या सरकारचा मला सांगायचंय, चुकून तुम्ही राज्यात सत्तेवर आलात भविष्यात जनता तुम्हाला दारात देखील उभं करणार नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय. सरकारने फक्त 15 महिने गोल गोल फिरवलं, कुठलाही डाटा कोर्टात जमा केला नाही, अशी घणाघाती टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ठाकरे सरकारवर केली. तसंच आरक्षण मिळेपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार देखील केला. त्या पुण्यात बोलत होत्या. (BJP Pankaja Munde Attacked on thackeray Government Over OBC Reservation in Pune)

आज ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी (OBC Political Reservation) भाजपने राज्यभर आंदोलन पुकारलं आहे. राज्याच्या विविध भागांत आज भाजप नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको, चक्काजाम आणि विविध आंदोलनाद्वारे आपला रोष व्यक्त करत आहेत. पुण्यात देखील भाजप नेत्यांनी आंदोलन करुन सरकारला जाब विचारला.

भाजप ओबीसींच्या पाठीमागे खंबीरपणे उभी

पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी ओबीसींना सांगू इच्छिते तुम्ही आपलं मन तुटू देऊ नका… संघर्षाची भावना तुटू देऊ नका… ओबीसींच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी आहे. भविष्यातल्या संघर्षासाठी आम्ही तयार आहोत.”

ठाकरे सरकारवर आसूड

मी मंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते… ओबीसीचे आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वरती गेले… याच्याविषयी कोर्टाच्या तारखा चालू होत्या… ते आरक्षण कसे योग्य आहे हे सांगण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये काही डाटा सबमिट करत होतो… आम्ही काही सर्व्हे करत होतो… आम्हाला कोर्टाने वेळ दिला होता… तेवढ्यात आचार संहिता लागली त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आलं आणि जवळपास पंधरा महिने झालं हे सरकार फक्त कोर्टाकडून तारखाच घेत आहे… इंपिरिकलच्या आधारे कृष्णमूर्ती यांच्या मतांच्या आधारावर सरकारने हा सगळा डाटा सबमिट करावा असं त्यांनी सांगितलं पण या सरकारने पंधरा महिन्यांमध्ये कुठलाही डाटा तयार केला नाही… सरकार फक्त गोल गोल फिरवतंय, असं म्हणत सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.

पंकजा मुंडेंकडून काँग्रेसचा समाचार

महाराष्ट्रभर आज चक्काजाम होतोय. भाजपाच्या आंदोलनानंतर सरकारी पक्षांमधील एका पक्षाने आंदोलनाची घोषणा दिली. मंत्री आज आंदोलनाची भाषा करतायत. शोभतं का तुम्हाला? आम्ही मंत्री असताना आंदोलन केलं का हो? आम्ही आरक्षण दिलं, आरक्षणाला संरक्षण दिलं…मंत्र्यांनी आंदोलन नाही तर निर्णय करायचे असतात… आंदोलन करायला विरोधी पक्ष आहे…, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.

(BJP Pankaja Munde Attacked on thackeray Government Over OBC Reservation in Pune)

हे ही वाचा :

तर ओबीसींचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी करावं, छगन भुजबळ यांची खुली ऑफर

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!