पंकजाताई होणाऱ्या त्रासाची मला जाणीव, मोठा भाऊ म्हणून मी सोबत, धनंजय मुंडेंची फेसबुक पोस्ट

Namrata Patil

|

Updated on: Apr 29, 2021 | 12:42 PM

आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई, अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर शेअर केली आहे. (Pankaja Munde Corona Positive Dhananjay Munde prayed for recover)

पंकजाताई होणाऱ्या त्रासाची मला जाणीव, मोठा भाऊ म्हणून मी सोबत, धनंजय मुंडेंची फेसबुक पोस्ट
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे
Follow us

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत.पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच त्यांचे बंधू आणि समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. “प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई,” अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर शेअर केली आहे. (Pankaja Munde Corona Positive Dhananjay Munde prayed for recover)

धनंजय मुंडे यांची फेसबुक पोस्ट 

“पंकजाताई, #COVID19 विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई,” अशी पोस्ट धनंजय मुंडेंनी टाकली आहे.

पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण 

दरम्यान काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनासदृश लक्षण दिसत होती. त्यामुळे त्या घरीच विलगीकरणात उपचार घेत होत्या. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. (Pankaja Munde Corona Positive Dhananjay Munde prayed for recover)

पंकजा मुंडे यांचे ट्वीट 

माझ्या कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून स्वत:ला विलग केलं होतं. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

प्रितम मुंडे यांना कोरोनाची लक्षणं

दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजप खासदार प्रितम मुंडे यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागली होती. बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन मुंबईला परतल्यावर त्यांना त्रास जाणवायला लागला. त्यांनी आपली RTPCR कोरोना चाचणी केली होती. मात्र, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर त्या घरीच विलगीकरणात थांबल्या होत्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने आणखी काही टेस्ट करणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली होती. (Pankaja Munde Corona Positive Dhananjay Munde prayed for recover)

संबंधित बातम्या : 

Pankaja Munde Corona | पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण, घरीच क्वारंटाईन

बहीण प्रीतम मुंडे यांना कोरोनाची लक्षणं, भाऊ धनंजय मुंडेंची भावनिक प्रार्थना म्हणाले…

सर्दी, खोकला आणि ताप, कोरोनाची लक्षणे, पण RTPCR चा रिपोर्ट निगेटिव्ह, खासदार प्रीतम मुंडे क्वारंटाईन

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI