पदवीधर निवडणूक : भाजपात डबल बंडखोरी, पंकजा समर्थकाचा उमेदवारी अर्ज, माजी जिल्हाध्यक्षाचाही बंडाचा झेंडा

| Updated on: Nov 11, 2020 | 4:18 PM

पंकजा मुंडे समर्थक प्रवीण घुगेंनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून बंडखोरी केली

पदवीधर निवडणूक : भाजपात डबल बंडखोरी, पंकजा समर्थकाचा उमेदवारी अर्ज, माजी जिल्हाध्यक्षाचाही बंडाचा झेंडा
Follow us on

औरंगाबाद : विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत (Teacher and Graduate Constituency Election 2020) भाजपमध्ये (BJP) जोरदार बंडखोरी होताना दिसत आहे. औरंगाबादमधून पंकजा मुंडे समर्थक प्रवीण घुगे (Pravin Ghuge) आणि बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे (Ramesh Pokle) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. (BJP Pankaja Munde supporter rebels in Aurangabad Graduate Constituency Election 2020)

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रवीण घुगे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून भाजपसोबत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबादमधून शिरीष बोराळकर यांना पक्षाने अधिकृतरित्या तिकीट दिले आहे. तर बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनीही बंडाचे निशाण फडकवत अर्ज भरला. पोकळे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा सोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. मराठवाड्यातील दोन मोठ्या उमेदवारांनी बंडखोरी केल्याने भाजपला जबर हादरा बसल्याचे बोलले जाते.

भाजपने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील चार उमेदवारांची घोषणा सोमवारी केली. भाजप  केंद्रीय समितीकडून नावाची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबादमधून शिरीष बोराळकर (Shirish Boralkar), पुण्यातून संग्राम देशमुख (Sangram Deshmukh), नागपुरातून संदीप जोशी (Sandeep Joshi) आणि अमरावतीतून नितीन धांडे (Nitin Dhande) यांना भाजपने तिकीट दिले आहे.

“मतदार चांगल्या पद्धतीचं मतदान करतील. मागील निवडणुकीची परिस्थितीत वेगळी होती. यावेळी परिस्थिती चांगली आहे. 2014 आणि 2020 च्या परिस्थितीत फरक आहे” अशी प्रतिक्रिया औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून तिकीट जाहीर झाल्यानंतर शिरीष बोराळकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली.

पुण्यात कोणाकोणात सामना?

संग्राम देशमुख (भाजप) vs जयंत आसगावकर (काँग्रेस) vs रुपाली पाटील ठोंबरे (मनसे) vs अभिजीत बिचुकले vs सोमनाथ साळुंखे (वंचित)

नागपुरातून रिंगणात कोण?

संदीप जोशी (भाजप) vs अभिजित वंजारी (काँग्रेस) vs राहुल वानखेडे (वंचित)

औरंगाबादमध्ये कोणाकोणात लढत?

शिरीष बोराळकर (भाजप) vs प्रवीण घुगे (भाजप बंडखोर) vs रमेश पोकळे (भाजप बंडखोर) vs नागोराव पांचाळ (वंचित)

(BJP Pankaja Munde supporter rebels in Aurangabad Graduate Constituency Election 2020)

एक डिसेंबरला निवडणुकीसाठी मतदान

विधानपरिषदेवरील पाच पदवीधर शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर दोन जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या पाच जागांसाठी एक डिसेंबरला मतदान होईल तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.

 

संबंधित बातम्या :

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी वंचितकडून उमेदवारी जाहीर, कोणाला संधी?

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार जाहीर, पंकजा मुंडे समर्थकाला औरंगाबादेतून तिकीट

(BJP Pankaja Munde supporter rebels in Aurangabad Graduate Constituency Election 2020)