2022 ची मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल : चंद्रकांत पाटील

मुंबईत 2022 ची निवडणूक जिंकणे हे आमच उद्धिष्टे असल्याने खूप बारकाईने आम्ही विचार केला." असेही चंद्रकांत पाटील (BJP Prepare for Municipal election) म्हणाले. 

2022 ची मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल : चंद्रकांत पाटील

मुंबई : येत्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरु केली (BJP Prepare for Municipal election) आहे. यानुसार नुकतंच भाजपने मुंबईतील संघटनात्मक रचना कशी असेल याबाबत एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती (BJP Prepare for Municipal election) दिली. “मुंबईत 2022 ची महापालिका निवडणूक ही भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल. ही निवडणूक जिंकण हे आमच उद्धिष्टं आहे. त्यामुळे अत्यंत बारकाईने या बैठकीत चर्चा केली. मुंबईचा पुढील महापौर हा भाजपचाच असेल,” असा संकल्पही या बैठकीत केला आहे असे चंद्रकांत पाटील (BJP Prepare for Municipal election) म्हणाले.

“गेल्या एक महिना हा राज्यातील सत्तास्थापनेमध्ये गेला. त्यानंतर आम्ही विभागावर जिल्ह्यातील संघटनात्मक रचना कशी होईल याबाबत बैठका केल्या. याच पार्श्वभूमीवर आज मुंबई शहराची बैठक झाली. मुंबईत एकूण 36 विधानसभा आहे. त्याचे आम्ही लोकसभेप्रमाणे 6 जिल्हे केले आहेत. तर मुंबईत एकूण 227 वॉर्ड आहे.” अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

“आता 2022 ला मुंबईत जी पालिका निवडणूक येणार आहे. ती भाजप स्वत:च्या ताकदीवर जिंकेल. मुंबईचा पुढचा महापौर हा भाजपचाच होईल. अशाप्रकारचा संकल्प आम्ही करुन निघालो आहे. मुंबईत 2022 ची निवडणूक जिंकणे हे आमच उद्धिष्टे असल्याने खूप बारकाईने आम्ही विचार केला.” असेही चंद्रकांत पाटील (BJP Prepare for Municipal election) म्हणाले.

“मुंबईत एकूण 10 हजार बुथ आहेत. त्यामुळे प्रत्येक बुथ घेऊन आम्ही त्यावर बुथ समिती, वॉर्ड अध्यक्ष यावर चर्चा केली. ही सर्व चर्चा येत्या 30 डिसेंबरपर्यंत संपेल. त्यानंतर काही ठिकाणी फेरनियुक्ता तर काही ठिकाणी नवीन नियुक्ती होईल,” असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

“त्यानुसार 15 डिसेंबरपर्यंत वॉर्ड अध्यक्षांच्या निवडणुका होतील. तर 20 डिसेंबरपर्यंत विधानसभेनुसार अध्यक्ष, 25 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यानुसार अध्यक्षांच्या निवडणुका होतील. तर त्यानंतर 30 डिसेंबरपर्यंत मुंबईचा अध्यक्ष घोषित होईल.” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच “मुंबईच्या अध्यक्षांची घोषणा होताना केंद्राचे नेते मुंबईत येतील.” असेही ते (BJP Prepare for Municipal election) म्हणाले.

दरम्यान “येत्या 1 ते 5 जानेवारीपर्यंत प्रदेशाध्याची घोषणा होईल. यानंतर केंद्रीय अध्यक्षासाठीचे वेळापत्रक लागेल” असेही त्यांनी सांगितले.

खडसे भाजप सोडणार नाहीत

“एकनाथ खडसे हे जुने कार्यकर्ते आहेत. वॉर्ड अध्यक्षांपासून सर्व स्तरावर त्यांनी काम केले आहे. भाजप वाढवण्यासाठी खडसेेंचे मोठे योगदान आहे. खडसे भाजप सोडण्याचा विचार करत नाही. असा विचारही त्यांच्या मनात येणार नाही आणि आम्हीही तो मनात आणणार नाही. याबाबत मी काल (7 डिसेंबर) त्यांच्याशी एक तासभर चर्चा केली. त्यांच्याकडून सर्व पुरावे घेतले. याबाबत अद्याप काहीही निष्कर्ष काढलेला नाही. त्यानंतर कारवाई होईल.” असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट (BJP Prepare for Municipal election) केले.

अजित पवारांना भाजपने नाही तर नव्या सरकारने क्लीन चीट दिली

तसेच अजित पवारांवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले,  “अजित पवार ज्या प्रकरणात दोषी आहेत त्या प्रकरणात भाजपने त्यांना क्लीन चिट दिलेली नाही. आता आलेल्या नव्या सरकारने अजित पवारांना क्लीन चिट दिलेली आहे. माझ्या बापानं आपला संसार नीट करावा असं सांगितलेलं आहे. दुसऱ्याचा संसार बघायला त्यांचे बाप आहेत.” असे मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *