शिवसेना मुख्यमंत्रिपदाबाबत अडून बसली तर भाजप विरोधात बसायला तयार?

Namrata Patil

|

Updated on: Nov 05, 2019 | 7:43 PM

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज संपन्न झाली. यावेळी महत्त्वाच्या खात्याबाबत तडजोड होईल, मात्र मुख्यमंत्री पदाबाबत कोणतीही तडजोड होणार नाही असा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली (BJP core committee meeting) आहे.

शिवसेना मुख्यमंत्रिपदाबाबत अडून बसली तर भाजप विरोधात बसायला तयार?
Follow us

मुंबई : भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज संपन्न झाली. यावेळी महत्त्वाच्या खात्याबाबत तडजोड होईल, मात्र मुख्यमंत्री पदाबाबत कोणतीही तडजोड होणार नाही असा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली (BJP core committee meeting) आहे. तसेच जर शिवसेना मुख्यमंत्रिपदावर अडून बसली, तर विरोधात बसायची तयारी ठेवा असेही या बैठकीत ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली (BJP core committee meeting) आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे उपस्थित होते.

भाजपकडून मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही तडजोड होणार नाही. मुख्यमंत्रीपद हे भाजपच्या गोट्यात असले आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील. जर शिवसेना अडून बसली तर भाजपविरोधात बसायला तयार आहे. त्यामुळे तशी विरोधात बसण्याची तयारी ठेवा असा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जर शिवसेनेशी तडजोड करायची असेल तर ती फक्त खात्याबाबत होईल. मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही तडजोड होणार नाही. जर खात्यांवर तडजोड होणार असली तरच शिवसेनेशी युती होईल असेही भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ठरले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजप शिवसेनेला महत्त्वाची खाती द्यायला तयार आहे. मात्र मुख्यमंत्री पद हे पाच वर्ष भाजपकडे असेल, अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून दिले जाणार नाही, असेही या कोअर टीमच्या बैठकीत ठरले आहे. यावरुन शिवसेना-भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम असल्याचे स्पष्ट होत (BJP core committee meeting) आहे.

या बैठकीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP core committee meeting) यांनी याबाबतची माहिती दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील (BJP core committee meeting) यांनी व्यक्त केला.

“शिवसेनेने अद्याप कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. सेनेसोबत चर्चा करण्यासाठी भाजपची दारं 24 तास उघडी आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला आहे, त्याचा आदर ठेवून, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात लवकरात लवकर सरकार स्थापन होईल, याबाबत आमच्या मनात शंका नाही”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक झाली. सरकार स्थापन करण्याचा जनादेश महायुतीला  दिला आहे. शिवसेनेने कोणताही प्रस्ताव अद्याप दिला नाही. आमची दारं चर्चेसाठी उघडी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होईल, याबद्दल आमच्या मनात शंका नाही”.

“वर्षा बंगल्यावर भाजप महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक झाली. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन होते. राज्याचा आढावा घेणारी ही बैठक होती. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीला सरकार स्थापन करण्यासाठी जनादेश दिला आहे. या जनादेशाचा आदर करुन, लवकरात लवकर आम्ही सरकार स्थापन करणार आहोत. शिवसेनेने अद्याप प्रस्ताव दिलेला नाही. तो प्रस्ताव लवकरात लवकर देताील. त्यावर चर्चा कऱण्यासाठी भाजपची दारं 24 तास उघडी आहेत. भाजप सर्वांना सोबत घेऊन जाणारं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन करण्यासाठी केंद्रीय नेतृत्त्वाचाही हिरवा कंदील आहे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

शिवसेना-भाजपमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन फूट

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता 13 दिवस उलटले. मात्र, सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. लहान भाऊ-मोठा भाऊ म्हणत ज्या भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे ही निवडणूक लढली, तेच आता मुख्यमंत्रिपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापना खोळंबली आहे. त्यातच आघाडीही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे.

संबंधित बातम्या : 

सेनेने अद्याप प्रस्ताव दिलेला नाही, मात्र देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील

“शिवसेनेचे आमदार फोडणं दूरच, उलट सत्तेला चिकटून राहणारे रवी राणाच शिवसेनेत येतील”

‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा, देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील’

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI