स्मृती इराणी आणि भिडे गुरुजींची भेट, राजकीय चर्चांना उधाण

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांची भेट (Smriti Irani meet Sambhaji Bhide) घेतली. स्मृती इराणी या सांगलीत भाजपच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आल्या होत्या

स्मृती इराणी आणि भिडे गुरुजींची भेट, राजकीय चर्चांना उधाण

सांगली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांची भेट (Smriti Irani meet Sambhaji Bhide) घेतली. स्मृती इराणी या सांगलीत भाजपच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आल्या (Smriti Irani meet Sambhaji Bhide) होत्या. स्मृती इराणी यांनी संभाजी भिडे गुरुजींची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्क सुरु झाले (Smriti Irani meet Sambhaji Bhide) आहेत.

भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारासाठी स्मृती इराणी सांगलीत आल्या होत्या. सांगलीतील मारुती चौकातील सभा संपल्यानंतर त्यांनी भिडे गुरुजींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर स्मृती इराणी यांनी भिडे गुरुजींची भेट घेतली.

या भेटीनंतर भिडे गुरुजींनी स्मृती इराणींना गणपती बाप्पाची एक प्रतिमा भेट म्हणून दिली. यावेळी भिडे गुरुजींनी स्मृती इराणी यांना रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधी दर्शनासाठी येण्याचे आमंत्रण दिले. भिडे यांच्या भेटीनंतर स्मृती इराणी पुढे इचलकरंजीसाठी रवाना झाल्या.

“काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार झाला. कोळसा घोटाळा, शेतकरी योजनांचा घोटाळा करणाऱ्या भ्रष्ट नेत्यांना जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही. जनतेला जनतेचे पैसे परत द्यावे,” अशी टीका स्मृती इराणी यांनी इचलकरंजीतील सभेत केली.

“काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असताना मुंबईवर हल्ला झाला. त्यावेळी केंद्र व राज्य सरकार बघत बसले होते. जम्मू, कश्मीर, लडाख हे सर्व आमचे आहे. हे जनतेला माहित आहे. पण हे काँग्रेस नेते राहुल गांधींना माहित नाही.ज्याने इचलकरंजीचे पैसे खाल्ले, त्यांनी मी नक्की जेलमध्ये पाठवणार”, असे वचन ही स्मृती इराणी यांनी इचलकरंजीतील सभेदरम्यान दिले.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI