‘लाईव्ह फजिती’ टाळण्यासाठी कार्यकर्त्यांचे प्रश्न भाजप अगोदरच मागवणार

'लाईव्ह फजिती' टाळण्यासाठी कार्यकर्त्यांचे प्रश्न भाजप अगोदरच मागवणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाईव्ह कार्यक्रमांत कुणीही अडचणीत टाकणारे प्रश्न विचारु नये, यासाठी आता विशेष काळजी घेतली जाणार आहे. लाईव्ह कार्यक्रमांत प्रश्न विचारणाऱ्यांचा आता तपास करण्यात येणार आहे. प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्यांचा व्हिडीओ तपासासाठी मागवण्यात आला आहे. तसेच मोदींच्या रविवारी झालेल्या ‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ या कार्यक्रमातही यासंबंधी विशेष काळजी घेण्यात आली. काही […]

Nupur Chilkulwar

|

Jul 05, 2019 | 4:48 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाईव्ह कार्यक्रमांत कुणीही अडचणीत टाकणारे प्रश्न विचारु नये, यासाठी आता विशेष काळजी घेतली जाणार आहे. लाईव्ह कार्यक्रमांत प्रश्न विचारणाऱ्यांचा आता तपास करण्यात येणार आहे. प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्यांचा व्हिडीओ तपासासाठी मागवण्यात आला आहे. तसेच मोदींच्या रविवारी झालेल्या ‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ या कार्यक्रमातही यासंबंधी विशेष काळजी घेण्यात आली. काही दिसवसांआधी तमिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील कार्यकर्त्यांशी पंतप्रधान लाईव्ह संवाद साधत होते. तेव्हा एका कार्यकर्त्याने सरकारवर कराचा बोजा लादल्याची तक्रार केली. या घटनेची सर्वत्र चर्चाही झाली.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कार्यकर्त्यांना लाईव्ह कार्यक्रमाच्या 48 तासांआधी पंतप्रधानांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचा व्हिडीओ करून पाठवायचा आहे. यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. लाईव्ह कार्यक्रमात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची अनेकवेळा तपासणी केली जाईल. जे काही पुडुचेरीत झालं ते परत होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात येत असल्याचं भाजपाच्या सूत्राने सांगितलं.

यासाठी नरेंद्र मोदी अॅपवर (नमो अॅप) कार्यकर्ते आपल्या प्रश्नांचा व्हिडीओ बनवून पाठवत आहेत. यापैकी काही निवडक प्रश्नच कार्यक्रमात विचारले जातील.

मागील बुधवारी मोदी हे ‘नमो अॅप’च्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी लाईव्ह संवाद साधत होते. मोदी कार्यकर्त्यांना केंद्र सरकारच्या कार्यकाळात झालेल्या विकासाचे आकडे सांगत होते. यादरम्यान पुद्दुचेरी येथील निर्मल कुमार जैन ने मोदींकडे एक तक्रार केली. निर्मल म्हणाले की ‘तुमची सरकार केवळ कर वसुलीवर भर देते आहे. मध्यम वर्गीय लोक आयटी सेक्टर, कर्ज मिळण्याची प्रक्रिया, बँकेचे व्यवहार आणि पेनल्टी यात सवलत मिळण्याची अपेक्षा करत आहे. पण असं होत नाहीये. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मिडल क्लास लोकांची तशीच काळजी घ्याल जशी तुम्ही कर वसुली करता.’

या प्रश्नाच्या उत्तरात मोदींनी जैन यांचे आभार मानले आणि सांगितले की ते व्यावसायिक आहेत, म्हणून ते व्यावहारिक बोलले. आपण याकडे लक्ष देऊ असे आश्वासनही मोदींनी दिलं. पण या प्रकरणानंतर भाजपकडून विशेष काळजी घेतली जात आहे, त्यासाठी कार्यक्रमाआधीच प्रश्न मागवले जात आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें