AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हायकमांडचा आदेश मोडला; भाजपचा महामंत्री शिंदे गटाने फोडला

एकमेकांचे नेते फोडू नका असे आदेशच भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी दिले होते. मात्र, हा आदेश धुडकावून लावल्याची घडामोड मुंबईत घडली आहे.

हायकमांडचा आदेश मोडला; भाजपचा महामंत्री शिंदे गटाने फोडला
एकनाथ शिंदे यांच्या गटाचे सर्व आमदार पुन्हा गुवाहाटीला जाणारImage Credit source: TV9 Marathi
vanita kamble
vanita kamble | Updated on: Oct 18, 2022 | 11:17 PM
Share

मुंबई : भाजपा-शिंदे गट एकत्र असले तरी दोन्ही गटांमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. दोन्ही गट एकमेकांचे नेते फोडत आहेत. ही फोडाफोडी थेट हायकमांड पर्यंत पोहचली होती. एकमेकांचे नेते फोडू नका असे आदेशच भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी दिले होते. मात्र, हा आदेश धुडकावून लावल्याची घडामोड मुंबईत घडली आहे. मुंबईतील भाजपचा महामंत्रीच शिंदे गटाने फोडला आहे.

मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाने भाजपला जबरदस्त धक्का दिला आहे. मुंबईत शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाने भाजपचा महामंत्री फोडला आहे.

भाजपचे उत्तर भारतीय सेलचे महामंत्री राम यादव आणि त्यांच्या पत्नी रेखा यादव यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे शिंदे गटाला उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तम नेतृत्व मिळाले आहे.

भाजपचे उत्तर भारतीय सेलचे महामंत्री राम यादव आणि त्यांच्या पत्नी रेखा यादव यांचा शिंदे गटातील प्रवेश हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थित त्यांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे.

भाजप सोडून बाळासाहेबांच्या शिवसेना (शिंदे गट) मध्ये पक्ष प्रवेश केलेल्या राम यादव यांच्या पत्नी रेखा यादव यांनी नाव न घेता आमदार मनीषा चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

आमची सर्व नेत्यांवर नाराजी आहे, आम्ही महिला नेत्याच्या कार्यालयात जायचो तेव्हा त्यांनी आम्हाला बसू दिले नाही, भेटही दिली नाही असं रेखा यादव म्हणाल्या.

थोडी नाराजी होती. पण, मात्र आता भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेची युती आहे. महापालिकेत जो उमेदवार दिला जाईल, तो जिंकू, असे राम यादव म्हणाले.

रेखा यादव यांनी प्रभाग क्रमांक 1 मधून अपक्ष नगरसेविकेची निवडणूक लढवली असून राम यादव हे भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे महामंत्री होते.

भाजपचे उत्तर भारतीय मोर्चाचे महामंत्री राम यादव यांचा शिंदे गटाने महापालिकेत तिकीट देण्याचे आश्वासन दिले असल्याचा दावा आमदार प्रकाश सुर्वे यांनी केला आहे.

राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार अस्तित्वात असले तरी स्थानिक पातळीवर वेगळेच चित्र आहे. शिंदे गटाचे नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तर भाजपचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत.

फोडोफाडीचे रुपांतर संघर्षात होऊ नये यासाठी आता थेट भाजप नेतृत्वानेच यात लक्ष घालून फोडाफोडीचे राजकारण करु नये अशा सुचना दिल्या होत्या. तरीही देखील मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गट आणि भाजपकडून एकमेकांचे नेते गळाला लावण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Follow Us
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर