नाराज समर्थकांसोबत महत्त्वाची बैठक, पंकजा मुंडे काय निर्णय घेणार?; वाचा सविस्तर

नाराज समर्थकांसोबत महत्त्वाची बैठक, पंकजा मुंडे काय निर्णय घेणार?; वाचा सविस्तर
पंकजा मुंडे, भाजप

खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे समर्थकांनी धडाधड राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (pankaja munde)

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: भीमराव गवळी

Jul 13, 2021 | 11:04 AM

मुंबई: खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे समर्थकांनी धडाधड राजीनामे दिले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे यांनी आज या नाराज समर्थकांची वरळी येथील निवासस्थानी बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत त्या काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (BJP’s Pankaja Munde calls meeting of her supporters today)

मोदी सरकारच्या विस्तारात प्रीतम मुंडे यांना संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, त्यांना डावलून भागवत कराड आणि भारती पवार यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. मुंडे भगिनींनी शह देण्यासाठीच कराड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यातच मुंडे भगिनींनी एकाही मंत्र्याना शुभेच्छा दिल्या नाही. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला. त्यानंतर पंकजा यांनी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन नाराज असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. त्यानंतर पंकजा यांच्या समर्थकांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली होती. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आज सकाळी वरळी येथील निवासस्थानाजवळी कार्यालयात नाराज समर्थकांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

समर्थक मुंबईत, मोठी गर्दी

भाजपचा निषेध म्हणून पदांचा राजीनामा देणारे पंकजा समर्थक मुंबईत दाखल झाले आहेत. सकाळीच घोषणा देत पंकजा समर्थकांनी वरळी गाठली. या समर्थकांनी वरळीतील पंकजा मुंडे यांच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी केली आहे. मुंडे भगिनींना सातत्याने डावलण्यात येत असून त्याचा निषेध म्हणून आम्ही राजीनामे दिले आहेत, असं या समर्थकांनी सांगितलं. तर, पंकजा मुंडे या समर्थकांची नाराजी दूर करून त्यांना राजीनामा मागे घेण्यास सांगणार असल्याचं सांगितलं जात आहे. पंकजा यांच्याकडून समर्थकांना सबुरीने घेण्याचा सल्लाही दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तीन दिवस राजीनामा सत्र

प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्याने बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे. मागील तीन दिवसांच्या काळात जिल्ह्यात 14 जिल्हा परिषद सदस्य, 35 पंचायत समिती सदस्य, 40 नगरसेवक, 16 बाजार समिती सदस्य, बीड जिल्ह्यातील भाजपचे 11 मंडळ अध्यक्ष या शिवाय शिरूर पंचायत समिती उपसभापतींसह केज, पाटोदा आणि गेवराई येथील पंचायत समितीच्या सभापतींनी आपल्या पदांचे राजीनामे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. (BJP’s Pankaja Munde calls meeting of her supporters today)

संबंधित बातम्या:

पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना, जेपी नड्डांशी चर्चा करणार; तर्कवितर्कांना उधाण

मुख्य निवडणुका होण्याआधीच इम्पिरीकल डेटा पूर्ण करा, नव्या मंत्र्यांकडून ओबीसींच्या खूप अपेक्षा: पंकजा मुंडे

एकनाथ खडसेंची ईडीकडून चौकशी; पंकजा मुंडे म्हणाल्या…

(BJP’s Pankaja Munde calls meeting of her supporters today)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें