पक्षात आलेल्या बड्या नेत्यांमुळे माझा पराभव झाला, राम शिंदेंची विखे पाटलांवर टीका

"पक्षात आलेल्या बड्या नेत्यांमुळे माझ्यासारख्या पराभव झाला," अशी टीका भाजप नेते राम शिंदे यांनी केली (Ram shinde criticizes bjp) आहे.

Ram shinde criticizes bjp, पक्षात आलेल्या बड्या नेत्यांमुळे माझा पराभव झाला, राम शिंदेंची विखे पाटलांवर टीका

नाशिक : राज्यात सत्ता गेल्याने आता भाजपला पक्षातंर्गत नाराजीचा सामना करावा लागत (Ram shinde criticizes bjp) आहे. भाजप नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्यानंतर आता राम शिंदे यांनीही पक्षातंर्गत होत असलेली खदखद जाहीरपणे व्यक्त केली आहे. यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोललं जात आहे. “पक्षात आलेल्या बड्या नेत्यांमुळे माझ्यासारख्यांचा पराभव झाला,” अशी टीका भाजप नेते राम शिंदे यांनी केली (Ram shinde criticizes bjp) आहे.

“विधानसभा निवडणुकांपूर्वी पक्षात आलेल्या बड्या नेत्यांचा पक्षाला काही फायदा झाला नाही. तर त्याउलट माझ्यासारख्यांचा पराभव बड्या नेत्यांमुळे  झाला,” अशी टीका भाजप नेते राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता केली आहे. यामुळे भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस दिवसेंदिवस वाढू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.

“पक्ष आपल्या म्हणण्याचा गांभीर्याने विचार करेल अशी आशा आहे. विखे पाटील आल्यामुळे जागा कमी झाल्या हे आपण पुराव्यानिशी पक्षाच्या निदर्शनास आणून दिलं आहे. असं देखील राम शिंदेंनी यावेळी (Ram shinde criticizes bjp) म्हटलं .”

भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील पराभूत उमेदवारांच्या बैठकीचं नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपा नेते अशिष शेलार यांनी पराभूत उमेदवारांची भूमिका जाणून घेतली. यावेळी राम शिंदे यांनी विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच पक्ष आपल्या आरोपांची दखल घेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

सत्तेच्या बाहेर राहावे लागल्याने, भाजपातील अनेक मंडळी नाराज आहेत. सत्ता गेल्यानंतर अंतर्गत कलह बाहेर येत असल्याचे देखील बघायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात ही धुसपूस वाढणार कि थांबणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *