Anil Deshmukh : अनिल देशमुखांना कोर्टाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला, कुंदन शिंदे, पलांडेलाही धक्का

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन कोर्टानं नाकारलाय. यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप केलाय.

Anil Deshmukh : अनिल देशमुखांना कोर्टाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला, कुंदन शिंदे, पलांडेलाही धक्का
अनिल देशमुखांना कोर्टाचा दणकाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 12:52 PM

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा जामीन कोर्टानं नाकारलाय. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने (Special CBI Court) फेटाळला. अनिल देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे हा मोठा धक्का देशमुखांना मानला जातोय. यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. दरमहा 100 कोटींच्या कथित खंडणी प्रकरणी मुंबई (Mumbai) उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांनुसार सीबीआयनं पहिला गुन्हा नोंदवत तपास सुरू केला होता. पुढे ईडीनं याच एफआयआरमध्ये अनिल देशमुखांसह इतरांना अटक केली होती. त्यानंतर आजपर्यंत देशमुख कैदेतच आहे.

अनिल देशमुखांना कोर्टाचा धक्का

वृत्तसंस्थेचं ट्विट

प्रकरण काय?

  1. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता.
  2. बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि इतरांना बार आणि रेस्टॉरंटमधून महिन्याला 100 कोटी वसूल करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोपही केला.
  3. या प्रकरणी नोव्हेंबर 2021 मध्ये 72 वर्षीय देशमुखांना अंमलबजावणी संचालनालय (ईडी)नं अटक केली.
  4. तेव्हापासून देखमुख कैदेतच आहेत.
  5. त्यानंतर या प्रकरणात सीबीआयनं मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयाकडून देशमुखांचा जबाब नोंदविण्यासाठी परवानगी मिळवली.
  6. 3 ते 5 मार्च 2022 रोजी कारागृहात जाऊन देशमुखांचा जबाब नोंदवला.
  7. याप्रकरणी सीबीआयच्यावतीनं विशेष सीबीआय न्यायालयात 59 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
  8. आता पुन्हा एकदा न्यायालयाचा देशमुख यांना झटका बसलाय.

यापूर्वी अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयनं आपलं आरोपपत्र सादर केलं आहे. दरमहा 100 कोटींच्या कथित खंडणी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांनुसार सीबीआयनं पहिला गुन्हा नोंदवत तपास सुरू केला होता. पुढे ईडीनं याच एफआयआरमध्ये अनिल देशमुखांसह इतरांना अटक केली होती. त्यानंतर हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना एप्रिल 2022 मध्ये सीबीआयनं अनिल देशमुखांसह संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझेला आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतलं होतं. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात संक्षिप्त आरोपपत्र दाखल केलं. यात अनिल देशमुखांसह त्यांचे स्विय सहाय्यक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांचाही आरोपी म्हणून आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे. तर सचिन वाझे हे आता या प्रकरणी माफीचा साक्षीदार म्हणून तपासयंत्रणेची आणि कोर्टाची मदत करणार आहेत.

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.