प्रसाद लाड धनंजय मुंडेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनजयं मुंडे यांची भेट (Prasad lad meet dhananjay munde) घेतली आहे. प्रसाद लाड हे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात महत्त्वाची भूमिका निभावत आहे.

Prasad lad meet dhananjay munde, प्रसाद लाड धनंजय मुंडेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : राज्याचे सत्तासमीकरण सध्या बदलू लागले आहे. भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनजयं मुंडे यांची भेट (Prasad lad meet dhananjay munde) घेतली. प्रसाद लाड हे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात महत्त्वाची भूमिका निभावत आहे. अशावेळी प्रसाद लाड हे धनंजय मुंडे यांच्या भेटीला पोहोचले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं (Prasad lad meet dhananjay munde) आहे.

धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी प्रसाद लाड यांची भेट झाली. ही भेट फक्त तात्पुरत्या काळासाठी होती असे प्रसाद लाड म्हणत आहेत. मात्र राजकीय समीकरणाच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर अनेक राजकीय नेते एकमेकांची भेट घेत आहेत. त्यातच आता ही भेट महत्त्वपूर्ण ठरणार (Prasad lad meet dhananjay munde) आहेत.

शिवसेना-भाजपमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन फूट

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता 14 दिवस उलटले. मात्र, सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. लहान भाऊ-मोठा भाऊ म्हणत ज्या भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे ही निवडणूक लढली, तेच आता मुख्यमंत्रिपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापना खोळंबली आहे. त्यातच आघाडीही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. त्यामुळे सत्ता स्थापन्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.

शिवसेनेला आतापर्यंत 7 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 56 वरुन 63 वर पोहचलं आहे, मात्र भाजपसोबत शिवसेनेचा अजूनही 36 चाच आकडा दिसत आहे.

भाजपला 12 अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांचं संख्याबळ 105 वरुन 117 जागांवर पोहोचलं आहे. भाजप-शिवसेना यांचं एकत्रित संख्याबळ 180 वर जातं. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने दुखावलेल्या शिवसेनेच्या पाठीवर काँग्रेस ‘हात’ ठेवला आणि राष्ट्रवादीने ‘वेळ’ साधली, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत 54 जागा मिळाल्या आहेत. मात्र तिसऱ्या क्रमांकावर असूनही राष्ट्रवादी सत्तास्थापनेच्या आखाड्यात चर्चेत आहे. त्यामुळे 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपची अडचण पवार ठरत आहेत. कारण जर राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला आणि काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा दिला तर भाजपच्या सत्तास्थापनेत अडथळा येऊ शकतो.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *