AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत चॅलेंज स्वीकारणार का? खासदारकीचा राजीनामा द्या, नगरसेवक होऊन दाखवा, प्रतापराव जाधवांचं वक्तव्य

संजय राऊत यांच्याकडे स्वाभिमान असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, असं आव्हान देण्यात आलंय.

संजय राऊत चॅलेंज स्वीकारणार का? खासदारकीचा राजीनामा द्या, नगरसेवक होऊन दाखवा, प्रतापराव जाधवांचं वक्तव्य
संजय राऊत Image Credit source: social media
| Updated on: Jan 26, 2023 | 8:45 AM
Share

गणेश सोलंकी, बुलढाणाः 40 दगड बुडून गाळात गेल्याशिवाय राहणार नाहीत, असं वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत (Sanjay Raut) यांना बुलढाण्याच्या खासदाराने चॅलेंज दिलंय. शिवसेनेशी (Shivsena) बंडखोरी करणाऱ्या 40 आमदारांवर टीका करण्याऐवजी त्यांनी स्वतः आधी निवडणूक लढवून दाखवावी. नगरसेवक तरी होऊन दाखवावं. स्वाभिमान असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा, असं वक्तव्य प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केलंय. आता संजय राऊत हे चॅलेंज स्वीकारणार का? किंवा प्रतापराव जाधव यांनी दिलेल्या आव्हानावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

काय म्हणाले प्रतापराव जाधव?

प्रतापराव जाधव म्हणाले, ‘ संजय राऊत यांनी एकही निवडणूक लढवलेली नाही. नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्याची हिंमतही त्यांच्यात नाही. इतक्या हिंमतीने ते बोलत असतील तर याच ४० आमदाराच्या भरोश्यावर ते राज्यसभेचे खासदार बनले आहेत. त्यांनी आधी स्वतःचा स्वाभिमान जागृत करावा. राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन टाकावा आणि नंतर तोडं फाटल्यासारखं बोलावं..

‘बाळासाहेबांच्या फोटोचा अपमान करू नका…’

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना प्रतापराव जाधव म्हणाले, उध्दव साहेब हे बाळासाहेबांचे वारस आहेत. बाळासाहेब त्यांचे वडील होते, हे सगळ्यांना माहिती आहे. पण राजकारणामध्ये विचारांचा वारसा असतो. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊनच आमही पुढे चाललो आहोत. खरं तर बाळासाहेबांचं फोटो वापरण्याचा अधिकार आम्हाला आहे. त्यांचे वडील असल्याने त्यांचा फोटो ते घरामध्ये लावू शकतात.काँग्रेस , राष्ट्रवादी, वंचित आणि एमआयएम सोबत घेऊन ते बाळासाहेबांचं फोटो वापरत असतील आवाहन आहे की , बाळासाहेबांच्या फोटोचा अपमान करू नका..

‘तुम्हीच फोटो वापरू नका..’

वंचित सह इतर लोकांनी बाळासाहेबांना नको ते बोलले, आणि त्यांना जर सोबत घेत असला तर उद्धव साहेबाना फोटो लावण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे.

सरकार कोसळणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी येत्या काही दिवसात सरकार कोसळणार असल्याचं वक्तव्य केलंय. त्यावरून प्रतापराव जाधव म्हणाले, ‘ मी 30ते 35 वर्षापासून राजकारणात आहे. राजकारणात सगळ्या प्रकारचे लोक संपर्कात असतात. सगळेच कार्यकर्ते सम सामसामान नसतात. लोकांना बोलण्यासाठी फक्त त्यांना पक्षात घेतले आहे. वाटेल ते हे लोक बडबड करताय. त्यांच्या बोण्याकडे फारसे कुणी महत्त्व देत नाही.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.