‘आमदार गोपीचंद पडळकरांना अटक करुन दाखवाच’, बैलगाडा शर्यतीवरुन सदाभाऊ खोतांचा सरकारला इशारा

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सांगलीतल्या झरे गावात 20 ऑगस्ट रोजी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे. तर कुठल्याही स्थितीत बैलगाडा शर्यत होणार नाही, असा पवित्रा स्थानिक प्रशासनानं घेतला आहे. झरे गाव आणि पंचक्रोशीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय.

आमदार गोपीचंद पडळकरांना अटक करुन दाखवाच, बैलगाडा शर्यतीवरुन सदाभाऊ खोतांचा सरकारला इशारा
सदाभाऊ खोत यांचा बैलगाडा शर्यतीवरुन राज्य सरकारला इशारा
| Edited By: | Updated on: Aug 19, 2021 | 6:39 PM

सांगली : बैलगाडा शर्यतीवरून राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सांगलीतल्या झरे गावात 20 ऑगस्ट रोजी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे. तर कुठल्याही स्थितीत बैलगाडा शर्यत होणार नाही, असा पवित्रा स्थानिक प्रशासनानं घेतला आहे. झरे गाव आणि पंचक्रोशीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. आमदार गोपीचंद पडळकर यांना अटक करुनच दाखवा, आमच्यात काय हिंमत आहे ते तुम्हाला दाखवू, असा इशारा खोत यांनी दिला आहे. (Sadabhau Khot warns Mahavikas Aghadi government about organizing bullock cart race)

बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावर सरकारला शांततेत उत्तर देता आलं असतं. घोड्याच्या शर्यती चालतात. मग बैलगाडीची शर्यती का चालत नाहीत? असं सत्तेत येण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत होते. त्याचं आता काय झालं? आता काय अस्वलाच्या शर्यती सुरु आहेत का? असा खोचक सवालही सदाभाऊ खोत यांनी विचारलाय. राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांशी देणं घेणं नाही. दोन वर्षात तुम्ही शेतकऱ्यांची बाजू न्यायालयात का मांडू शकला नाही. दिलीप वळसे-पाटीलही यासाठी रस्त्यावर उतरु असं म्हणाले होते. हे तालिबानी वृत्तीचं सरकार आहे. लबाडाचं आणि अलीबाबा चाळीस चोरांचं सरकार आहे, अशी घणाघाती टीकाही खोत यांनी केलीय.

काही झालं तरी बैलगाडा शर्यती होणार म्हणजे होणार, अशी भूमिका खोत यांनी मांडली आहे. शर्यती नाही झाल्या तर मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागेल. आमदार गोपीचंद पडळकर यांना अटक करुन दाखवाच. आमच्यात हिंमत आहे ती आम्ही दाखवून देऊ, असा इशाराही खोत यांनी यावेळी दिलाय.

गोपीचंद पडळकर आक्रमक

महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात एवढा बळाचा वापर का करत आहे? राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हा इतिहास आहे. सत्तेत आले की शेतकऱ्यांना गोळ्या घालतातच. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपणही सामील झालात? मला अटक करणार निश्चित पण गोवंशाच्या अस्तित्वासाठी. बैलगाडा_शर्यत होणारच. असा पवित्रा, गोपीचंद पडळकर यांनी घेतलाय.

इतर बातम्या : 

बैलगाडा शर्यत होणार की नाही? गुन्हे दाखल करण्याचा प्रशासनाचा इशारा, आटपाडी तालुक्यातील 9 गावांमध्ये संचारबंदी

बैलगाडा शर्यत टाळण्यासाठी पोलिसांकडून धरपकड; जेलमध्ये टाकलं तरी शर्यत होणार, गोपीचंद पडळकरांचा आक्रमक पवित्रा

Sadabhau Khot warns Mahavikas Aghadi government about organizing bullock cart race