AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बैलगाडा शर्यत टाळण्यासाठी पोलिसांकडून धरपकड; जेलमध्ये टाकलं तरी शर्यत होणार, गोपीचंद पडळकरांचा आक्रमक पवित्रा

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतल्या झरे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही शर्यत होऊ नये यासाठी पोलिसांकडून शेतकऱ्यांची धरपकड सुरु करण्यात आलीय. तीन शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सगळ्या जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे आदेश सांगली पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.

बैलगाडा शर्यत टाळण्यासाठी पोलिसांकडून धरपकड; जेलमध्ये टाकलं तरी शर्यत होणार, गोपीचंद पडळकरांचा आक्रमक पवित्रा
गोपीचंद पडळकर, भाजप आमदार
| Edited By: | Updated on: Aug 17, 2021 | 7:59 PM
Share

सांगली : बैलगाडा शर्यतीवरुन राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीतल्या झरे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही शर्यत होऊ नये यासाठी पोलिसांकडून शेतकऱ्यांची धरपकड सुरु करण्यात आलीय. तीन शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सगळ्या जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे आदेश सांगली पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. इतकंच नाही तर जिल्ह्यातील बैलगाडा मालकांना पोलीस विभागाकडून नोटीसा देण्यात आल्या आहेत. (Sangli police started action against bullock cart race)

एकीकडे पोलिसांकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आक्रमक पवित्रा घेतलाय. मला जेलमध्ये टाकलं तरी बैलगाडा शर्यत होणार. राष्ट्रवादी काँग्रेसचं गृहमंत्रालय बळाचा वापर करत आहे. आमच्या शेतकऱ्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात झाली आहे. काय कारवाई व्हायची ती होऊ द्या. मी बैलगाडा शर्यत भरवणारच, असा पवित्रा पडळकर यांनी घेतला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरुन राजकारण तापण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे.

पडळकरांकडून 1 लाख 11 हजाराचं बक्षीस

पडळकर यांनी येत्या 20 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील झरे गावात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या बैलगडा शर्यतीसाठी पडळकर यांनी लाखो रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यास कायद्यानुसार बंदी आहे. ही बंदी उठवण्याची मागणी राज्यातील काही संघटना तसेच पक्षांनी केली आहे. या मुद्द्याला घेऊन अनेक ठिकाणी आंदोलनदेखील करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बैलडागा शर्यतीसाठी पडळकरसुद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यातील झरे या गावात भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. या शर्यतीत प्रथम येणाऱ्यास त्यांनी 1 लाख 11 हजार रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं जाहीर केलंय. द्वितीय तसेच तृतीय आणि चौथा क्रमांक पटकावणाऱ्यांनाही वेगवेगळे बक्षीस देण्यात येणार आहे.

बैलगाडा शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीतून निर्णय घ्यावा लागेल

बैलगाडा शर्यतीबाबत कायद्याच्या चाकोरीतून निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलाय. बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्पष्ट आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध आहेत, तोवर ती सर्वांनाच लागू असतील. त्यामुळे कुठे बैलगाडा शर्यत होत असतील तर त्यावर कायद्याच्या चाकोरीत बसून निर्णय घ्यावा लागेल, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.

संबंधित  बातम्या :

बैलगाडा शर्यत आयोजित करणे अंगलट, अहमदनगरमध्ये 47 जणांवर गुन्हा, 6 जण ताब्यात

आमदार निलेश लंकेंच्या बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी भेटीगाठी, बड्या मंत्र्याला भेटले

Sangli police started action against bullock cart race

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.