ठाकरे आडनाव लावल्याने कोणी ठाकरे होत नाही, अमृता फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका

ठाकरे आडनाव लावल्याने कोणी ठाकरे होत नाही, अमृता फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका (Amruta Fadnavis tweet on thackeray) केली आहे.

Namrata Patil

|

Dec 22, 2019 | 11:42 PM

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका (Amruta Fadnavis tweet on thackeray) केली आहे. “ठाकरे आडनाव लावल्याने कुणी ठाकरे होत नाही. त्यासाठी तत्त्वनिष्ठ असावं लागतं”, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी कले आहे. यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी झाडांच्या कत्तलीसाठी विरोध करत शिवसेनेवर टीका केली (Amruta Fadnavis tweet on thackeray) होती.

“ठाकरे आडनाव लावल्याने कोणीही ठाकरे होत नाही. त्यासाठी खरं आणि तत्वनिष्ठं असावं लागतं. लोकांच्या भल्यासाठी काम करावं लागतं. एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्ता यांच्या कार्यपद्धतीपेक्षा लोक आणि पक्षाच्या सदस्यांच्या हितासाठी तत्त्वनिष्ठ विचार करण्याची गरज असते,” असे ट्विट अमृता फडणवीसांनी केले आहे.

विशेष म्हणजे अमृता फडणवीस यांनी या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनाही टॅग केलं आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या 14 डिसेंबरच्या ट्विटला रिट्विट करत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली (Amruta Fadnavis tweet on thackeray) आहे.

या आधीही अमृता फडणवीस यांनी आरे कारशेडला दिलेल्या स्थगितीवरुन शिवसेनेला टोला लगावला होता. “शिवसेना ही ढोंगी आहे. आपल्या सोयीप्रमाणे ते झाडांच्या कत्तलीसाठी विरोध करतात,” असं ट्वीट करत अमृता फडणवीस (Amruta Fadnavis tweet shivsena) यांनी शिवसेनेवर आरोप केले होते.

औरंगाबाद येथे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी झाडं कापण्यात येणार आहे, अशा आशयाची बातमी एका वृत्तपत्रात छापून आली होती. या बातमीचा फोटो अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. “शिवसेना ही ढोंगी आहे. आपल्या सोयीप्रमाणे ते झाडांच्या कत्तलीला विरोध करतात. तसेच शिवसेना कमिशनखोरी आहे. त्यांचा ढोंगीपणाचा आजार लवकर बरा होईल,” असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले (Amruta Fadnavis tweet shivsena) होतं. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

दरम्यान नागरिक्त्व सुधारणा कायदा (CAA) आणि NRC या विधेयकाला शिवसेनेने लोकसभेत पाठिंबा दिला होता. तर राज्यसभेत मात्र यावर आक्षेप घेतला होता. शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकांवर लक्ष वेधण्यासाठी अमृता फडणवीस यांनी ट्विट केल्याचे बोललं जात आहे. तसेच काँग्रेसचा पाठिंबा मिळवताना हिंदुत्वाच्या मुद्द्याशी शिवसेनेने केलेली तडजोड यावरुनी त्यांनी हे ट्विट केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे नुकतंच ठाकरे सरकारने केलेल्या कर्जमाफी मुद्द्यावरुनही त्यांनीही ही टीका केल्याची बोललं जात आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें