Video : केदार दिघेंविरोधात महिलेला धमकावल्याचा गुन्हा; हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज समोर, पोलिसांकडून सखोल चौकशी सुरु

1 ऑगस्ट 2022 रोजीचा हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागलंय. त्यात रोहित कपूर आणि केदार दिघे हे दोघे दिसत आहेत. त्यामुळे हे दोघे त्याच दिवशी या हॉटेलमध्ये काय करत होते? असा प्रश्न आता विचारला जातोय. पोलीस या प्रकरणाची आता सखोल चौकशी करत आहेत.

Video : केदार दिघेंविरोधात महिलेला धमकावल्याचा गुन्हा; हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज समोर, पोलिसांकडून सखोल चौकशी सुरु
केदार दिघेंविरोधात गुन्हा, हॉटेलमधील सीसीटीव्ही फुजेज समोरImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 11:56 PM

मुंबई : धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे (Kedar Dighe) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण एका महिलेनं त्यांच्याविरोधात धमकावल्याचा गुन्हा (Crime of intimidation) दाखल केलाय. सेंट रेजीस या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार झाल्याची तक्रार एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात देण्यात आलीय. त्यात रोहित कपूर या बड्या व्यावसायिकानं हा अत्याचार केल्याचा आरोप पीडित युवतीनं केलाय. तर पैसे घे आणि याची वाच्यता कुठे करु नकोस, नाहीतर सुला संपवू अशी धमकी केदार दिघे यांनी दिल्याचं या तक्रारीत संबंधित युवतीने म्हटलंय. 1 ऑगस्ट 2022 रोजीचा हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही (CCTV Footage) पोलिसांच्या हाती लागलंय. त्यात रोहित कपूर आणि केदार दिघे हे दोघे दिसत आहेत. त्यामुळे हे दोघे त्याच दिवशी या हॉटेलमध्ये काय करत होते? असा प्रश्न आता विचारला जातोय. पोलीस या प्रकरणाची आता सखोल चौकशी करत आहेत.

महिलेचा नेमका आरोप काय?

बलात्कार पीडित महिलेनं धमकावल्याप्रकरणी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रोहित कपूर याने 28 जुलै रोजी लोअर परळच्या सेंट रेजिस या हॉटेलमध्ये एका कर्मचारी तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीने पीडितेला धनादेश देण्यासाठी हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तर पीडित तरुणीने तक्रार करु नये म्हणून केदार दिधे यांनी तिला धमकावल्याचा आरोप करण्यात आलाय. पोलिसांनी दिघे यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 506 (गुन्हेगारी धमकी) तर रोहित कपूरविरोधात कलम 376 नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

शिवसेना नेत्यांचा भाजपवर आरोप

राज्यात आणि केंद्रात सत्तेचा दुरउपयोग सुरु आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा केला जात आहे. शिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुख पदी केदार दिघे यांची नियुक्ती होताच त्यांच्यावर बलात्कार पीडितेला धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. केदार दिघे विरोधात ईडीची कारवाई करता येत नसल्याने पोलीस चौकशीची सिसेमिरा लावला जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी केला आहे तर जिल्हाप्रमुख पदी निवड होताच सदरील महिलेने तक्रार कशी नोंदवली असा सवाल मनिषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे यामागे राजकारण असल्याचे नव्याने सांगायची गरज नाही. पूर्वी लहान मुलांना गब्बर याची भिती दाखवली जात होती आता विराधात बोलणाऱ्यांना भाजपाकडून ईडी ची भिती दाखवली जात असल्याचा आरोप अंधारे यांनी केला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.