Girish Mahajan : गिरीश महाजन यांच्याकडून अनिल देशमुखांबाबत मोठा गौप्यस्फोट, ‘त्यांना माझ्यासमोर…’

Girish Mahajan : "दिलीप वळसे पाटील ऐकत नाही. नालायक माणूस आहे, असं प्रवीण चव्हाण बोलतोय. अनिल देशमुख जेलेमध्ये गेले, तरी त्यांच्याकडे रेडकार्पेट ट्रिटमेंट मिळते. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्याविरोधात काही असेल तर सांगा असं आपल्याला अनिल देशमुख सांगतात, असं प्रवीण चव्हाण म्हणतो"

Girish Mahajan : गिरीश महाजन यांच्याकडून अनिल देशमुखांबाबत मोठा गौप्यस्फोट, 'त्यांना माझ्यासमोर...'
गिरीश महाजन
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 12:23 PM

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून काल गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर आहे. आता गिरीश महाजन यांनी या प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. “अनिल देशमुख आणि त्यांच्या नेत्यांनी माझ्याविरोधात कटकारस्थान केलं हे सिद्ध झालय. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे गुन्हा दाखल करत नव्हते. ते महिनाभर थांबले. पुण्यात घटना घडली आणि 3 वर्ष 12 दिवसांनी जळगाव जिल्ह्यात 650 किलोमीटर अंतरावर निंबोऱ्यात गुन्हा कसा नोंदवायचा? यासाठी ते तयार नव्हते” असं गिरीश महाजन म्हणाले.

“अनिल देशमुखांनी त्यांच्यावर खूप दडपण आणलं. अत्यंत खालच्या भाषेत एसपींबरोबर बोलले. एसपी प्रवीण मुंडे माझ्याशी बोलले, त्यांनी मला सांगितलं, भाऊ माझ्यावर दडपण आणलं जातय. निलंबित करण्याची धमकी दिली जातेय” असा दावा गिरीश महाजन यांनी केला. “मी स्वत: या संदर्भात अनिल देशमुखांना भेटलो. ते म्हणाले मी हतबल आहे. माझ्यावर वरिष्ठांच दडपण आहे. माझ्यासमोर त्यांना विचारा, गिरीश महाजन तुम्हाला कितीवेळा भेटले? त्यांनी मला सांगितलं, माझ्यावर दडपण आहे, तुम्ही पवारसाहेबांना भेटून घ्या, तरच मी तुमची काही मदत करु शकेन” असा गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी केला.

‘दडपशाही कोणाची, माझ्यासमोर बोलायला सांगाना’

“अनिल देशमुख यांनी एकनाथ खडसे आणि शरद पवार यांचं नाव घेतलं. एकनाथ खडसे वारंवार शरद पवारसाहेबांकडे जाऊन बसायचे. त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणला” असा दावा गिरीश महाजन यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं अनिल देशमुख म्हणत आहेत. त्यावर गिरीश महाजन म्हणाले की, “दडपशाही कोणाची, माझ्यासमोर बोलायला सांगाना. अनिल देशमुख यांचे स्पेशल पीपी प्रवीण चव्हाण यांची सीडी आलीय. ते अनिल देशमुख यांचं कौतुक करत आहेत” “दिलीप वळसे पाटील ऐकत नाही. नालायक माणूस आहे, असं प्रवीण चव्हाण बोलतोय. अनिल देशमुख जेलेमध्ये गेले, तरी त्यांच्याकडे रेडकार्पेट ट्रिटमेंट मिळते. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्याविरोधात काही असेल तर सांगा असं आपल्याला अनिल देशमुख सांगतात, असं प्रवीण चव्हाण म्हणतो. याचे व्हिडिओ आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलीय” असं गिरीश महाजन म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.
तानाजी सावंतांच्या त्या वक्तव्यानंतर अजितदादा परांडा मतदारसंघात जाणार?
तानाजी सावंतांच्या त्या वक्तव्यानंतर अजितदादा परांडा मतदारसंघात जाणार?.
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जात असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जात असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा.