AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेळ साधला अन् आपलं सरकार आलं; गेल्या अडीच वर्षांपासून…, चंद्रकांत पाटलांचा नव्या सरकारबाबत मोठा दावा

चंद्रकांत पाटील यांनी नव्या सरकारबाबत मोठा दावा केला आहे. मात्र हा दावा शिंदे गटाकडून फेटाळण्यात आला आहे.

वेळ साधला अन् आपलं सरकार आलं; गेल्या अडीच वर्षांपासून..., चंद्रकांत पाटलांचा नव्या सरकारबाबत मोठा दावा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2022 | 1:07 PM
Share

मुंबई :  राज्यात गेल्या दोन  महिन्यांपासून जोरदार राजकीय घडामोडी घडत असल्याचं पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उठावानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्यानं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान आता भाजप (BJP) नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नव्या सरकारबाबत मोठा दावा केला आहे. राज्यात सरकार आणण्यासाठी अडीच वर्षांपासून प्लॅनिंग करत होतो. वेळ साधला अन् आपलं सरकार आलं असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी चंद्रकांत पाटलांचा हा दावा फेटाळून लावला आहे.  आमचं कुठलंही प्लॅनिंग नव्हतं असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं चंद्रकांत पाटील यांनी?

चंद्रकांत पाटील यांनी नव्या सरकारबाबत मोठा दावा केला आहे. राज्यात सरकार आणण्यासाठी अडीच वर्षांपासून प्लॅनिंग करत होतो. वेळ साधला अन् आपलं सरकार आल्याचं चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या या दाव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.

पाटलांच्या दाव्याचे खंडन

दरम्यान दुसरीकडे चंद्रकांत पाटलांच्या या दाव्यावर प्रतिक्रिया देतान शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचा दावा फेटाळून लावला आहे. आमचं कसलंही प्लॅनिंग नव्हतं जे काय झालं ते उत्स्फूर्त होतं, असं म्हणत केसरकरांनी पाटलांचा दावा फेटाळून लावला आहे.  तसेच आमच्याकडेच बहूमत असल्याने धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळेल असंही यावेळी दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील बहूमतामुळे धनुष्यबाण आम्हालाच मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट