AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur : संजय राऊत बावचळले म्हणूनच नागपूरच्या दौऱ्यावर आले, बावनकुळेंचा खोचक टोला

गेल्या तीन वर्षात ओबीसी च्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारला मार्गी लावता आलेला नाही. शिवाय यामधीलच काही नेत्यांना हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा करायचा होता. त्यामुळे समाजावर अन्याय होत होता. पण आता नैसर्गिक युती असलेले सरकार राज्यात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री हे राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतील.

Nagpur : संजय राऊत बावचळले म्हणूनच नागपूरच्या दौऱ्यावर आले, बावनकुळेंचा खोचक टोला
चंद्रशेखर बावनकुळे
| Edited By: | Updated on: Jul 16, 2022 | 1:56 PM
Share

नागपूर :  (Maharashtra) राज्यात शिंदे सरकारची स्थापना झाल्यापासून नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप हे वाढत आहेत. विरोधी पक्षाकडून हे सरकारच नियमबाह्य असल्याचे सांगितले जात आहे तर दुसरीकडे (Eknath Shinde) शिंदे सरकारच राज्यासाठी फायद्याचे राहणार असल्याचे सत्ताधारी म्हणत आहेत. राजकीय कलगीतुऱ्यात आरोपाची पातळी खलावत आहे. सध्याचे सरकार म्हणजे एक दुजे के लिऐ.. असा आरोप खा. संजय राऊत यांनी केला होता. मात्र, संजय राऊत हे सत्तांतरानंतर बावचळून गेले आहेत. त्यामुळे सकाळ-दुपार आणि संध्याकाळी माध्यमांशी संवाद साधून अशी टिका करीत आहेत. यामुळेच त्यांच्यावर नागपूर दौरा करण्याची नामुष्की ओढावली असल्याचा घणाघात हा (ChandraShekhar Bawankule) चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. शिवाय ओबीसी आरक्षण केवळ महाविकास आघाडी सरकारमुळेच रखडल्याचाही आरोप त्यांनी केला.

सत्तांतरानंतर महाविकास आघाडी अस्वस्थ

मध्यंतरीच्या सत्तांतरानंतर महाविकास आघाडीमधील नेते बावचळले आहे. कुणाला अपेक्षित नव्हते असेच घडले आहे. त्यामुळे केवळ आरोप करण्याचे काम सध्या विरोधकांकडून सुरु आहे. मात्र, आता शिंदे सरकारच्या काळात ओबीसी राजकीय आरक्षण, मेट्रो प्रकल्प अशी मोठी कामे मार्गी लागणार आहेत. यामध्ये अडथळा निर्माण होईल असे काहीच नाही. शिवाय विकास कामे होत असतानाच पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत घेतलेला निर्णय हा सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे. राज्य सरकारने विकास कामाचा धडाका सुरु केल्याने महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

‘ओबीसी’ च्या आरक्षणाचाही प्रश्न मार्गी

गेल्या तीन वर्षात ओबीसी च्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारला मार्गी लावता आलेला नाही. शिवाय यामधीलच काही नेत्यांना हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा करायचा होता. त्यामुळे समाजावर अन्याय होत होता. पण आता नैसर्गिक युती असलेले सरकार राज्यात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री हे राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतील. विरोधकांनी काही नाही झाले तरी सध्या सुरु असलेली विकासकामे ही शांत बसून पहावीत असा सल्लाही बावनकुळे यांनी दिला आहे.

तर टिका करण्यासारखे काही उरणारच नाही

सरकार स्थापन होऊन अजून महिनाही उलटला नाही. मात्र, राज्यात विकास कामाचा धडाका सुरु आहे शिवाय निर्णयही झपाट्यात होत आहे. सध्या विरोधकांकडून टीका होत असली तरी काही काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे होतील की त्यांना तोंड दाखवायलाही जागा उरणार नसल्याचा घणाघात बावनकुळे यांनी केला आहे. शिवाय हे सरकार कार्यक्षम असल्याने गडचिरोलीत पूर येताच आढावा घेण्यात आला. महाविकास आघाडी सरकारने फेसबुक लाईव्ह करुन आवाहन केले असते. पण हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे थेट जनतेपर्यंत पोहचले असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले आहे.

मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.