AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामतीचं घड्याळ बंद पाडणार, बावनकुळेंनी सांगितला भाजपचा पुढचा अजेंडा…

पुढच्या निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेवर भाजपाचीच सत्ता आणून अध्यक्षपदही भाजपाकडे येणार असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

बारामतीचं घड्याळ बंद पाडणार, बावनकुळेंनी सांगितला भाजपचा पुढचा अजेंडा...
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Oct 20, 2022 | 4:21 PM
Share

सुनिल थिगळे, पुणेः बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचं(NCP) घड्याळ बंद पाडू, असं आव्हान भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिलंय. इथलं घड्याळ बंदच पाडणार, अशी घोषणा त्यांनी केली आहे. तसेच बारामतीनंतर (Baramati) खेड आळंदीही आमच्या टार्गेटवर असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय. आमदार रोहित पवारांनी भाजपा आता शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा डाव आखत असल्याचा दावा केला होता. मात्र फोडा-तोडा ही वृत्ती राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, असा प्रत्यारोप बावनकुळे यांनी केला. खेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांनी आज भाजपात प्रवेश केला. याप्रसंगी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.

शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, ‘ राष्ट्रवादी काँग्रेसने आजपर्यत याला फोड, मार त्याला तोड ही वृत्ती अवलंबली. आयुष्यभर पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहिले मात्र कधीच पंतप्रधान बन शकले नाही. पुढे भविष्य माहित नाही .. असं म्हणत नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळेंनी अप्रत्यक्ष लक्ष्य केलं. चंद्रशेखर बावनकुळे खेड तालुक्यातील वाडा येथील भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते..

भाजपाने पुण्याच्या ग्रामीण भागात पक्ष संघटन बांधणी करत पुणे जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतींवर लक्ष केंद्रीत केलय. पुढच्या निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेवर भाजपाचीच सत्ता आणून अध्यक्षपदही भाजपाकडे येणार असल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता आहे. याच सत्तेला भाजपाने लक्ष केलंय. त्यामुळे आगामी काळात भाजपाचा सामना थेट राष्ट्रवादी कॉग्रेस असाच असणार आहे, असं दिसतंय. पुण्याच्या ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेस बालेकिल्ला असलेल्या खेड आळंदी विधानसभा मतदार संघात भाजपाने पक्ष बळकटीसाठी कार्यकर्ता मेळावा घेत, राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडलंय.

राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते आणि कात्रज दुध संघाचे माजी संचालक शेखर शेटे, खेड पंचायत समितीचे माजी सभापती कल्पना गवारी, माजी आमदार नारायण पवार यांची मुलगी प्रिया पवार यांनी आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला. आजचा आवाज सिल्वर ओक वर जाणार असा टोलाही बानवकुळेंनी लगावला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?