AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अविश्वास ठराव आणायलाच हवा होता तर… चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान; कारणही सांगितलं!

अविश्वास ठरावावरूनही राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन बसतात, अशी बोचरी टीका बावनकुळे यांनी केली.

अविश्वास ठराव आणायलाच हवा होता तर... चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान; कारणही सांगितलं!
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Dec 30, 2022 | 12:46 PM
Share

नागपूरः हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांविरोधात (Maharashtra Assembly speaker) अविश्वास ठराव आणण्याची महाविकास आघाडीची तयारी सुरु आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मात्र यावर खरपूस टीका केली आहे. अविश्वास ठराव आणायचाच होता तर तो पहिल्या दिवशी आणायला पाहिजे होता. शेवटच्या दिवशी ठराव आणणं म्हणजे फुसका बॉम्ब आहे.

तसेच या ठरावाला फार मतं मिळतील, अशीही शक्यता कमी आहे. कारण आमच्याकडेच 20 ते 25आमदार पुन्हा येणार आहेत. 184 च्या वर मतदान होईल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी दर्शवला.

हिवाळी अधिवेशात विरोधी पक्ष नेत्यांनी राजकीय विषयांवर भाष्य केलं. पण अखंड महाराष्ट्राचा विकास कसा होईल, सरकारकडून काय मिळेल, विदर्भातून काय मिळेल, मराठवाड्यातून काय मिळेल, यावर बोलले नाही.. विरोधक केवळ टाइमपास करतात, वेळ खराब करतात, दुतर्फी भूमिका मांडतात, विधान परिषदेतही एकमत नसल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

अविश्वास ठरावावरूनही राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन बसतात, अशी बोचरी टीका बावनकुळे यांनी केली.

बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवरही टीका केली. ते म्हणाले, ‘ अडीच वर्ष उद्धव यांच्या सरकारने योग्य काम केलं नाही.. धानाचं बोनस मिळावा म्हणून नाना पटोले यांनी अडीच वर्ष अजित पवारासमोर नाक रगडलं, पण हाती काहीच मिळालं नाही..

कर्नाटकचे काँग्रेस अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी सीमावादावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्राला कर्नाटकची एक इंच जागाही देणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलंय. यावरून बावनकुळे यांनी काँग्रेसवरच प्रश्न उपस्थित केलाय. कालपर्यंत विरोध पक्ष भाजपवर टीका करत होते.

आता काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार यांचा निषेध करणार का? काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे बावनकुले म्हणालेत.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.