AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16: अर्चना गौतममुळे सलमानचा पारा चढला; थेट शोमधून काढणार बाहेर?

'बिग बॉस'च्या स्पर्धकांवर चिडला सलमान; अर्चना गौतमच्या वागणुकीनंतर घेणार मोठा निर्णय?

Bigg Boss 16: अर्चना गौतममुळे सलमानचा पारा चढला; थेट शोमधून काढणार बाहेर?
Archana Gautam and Salman KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 30, 2022 | 12:30 PM
Share

मुंबई: ‘बिग बॉस 16’ हा शो सध्या चांगलाच गाजतोय. या आठवड्यात एकीकडे अर्चना गौतम आणि विकास मानकतला यांच्यात जोरदार भांडण झालं. तर दुसरीकडे सौंदर्या शर्मा आणि श्रीजिता डे यांनी लिपलॉक केल्याचं पहायला मिळालं. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक दर आठवड्याला असं काही करतात, ज्यामुळे वीकेंड का वार एपिसोडमध्ये त्यांना सलमान खानचा ओरडा खावा लागतो. या आठवड्यात सलमान हा अर्चना गौतमची चांगलीच शाळा घेणार आहे.

अर्चनावर भडकला सलमान

‘वीकेंड का वार’ या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सलमान अर्चनावर खूप भडकला आहे. “तू भांडणात थेट आई-वडिलांवर जातेस”, असं सलमान तिला म्हणतो. त्यावर अर्चना म्हणते, “हे सर्वजण माझ्या मागे लागतात.” अर्चनाला सुनावताना सलमान पुढे म्हणतो, “याच गोष्टींमुळे तुझ्या प्रतिमेच्या चिंधड्या उडाल्या आहेत. सर्वांच्या विरोधात जाऊन जर मी तुला पुन्हा बिग बॉसच्या घरात आणू शकतो, तर तुला घराबाहेर काढण्याचीही ताकद माझ्याकडे आहे.”

अर्चना गौतम आणि विकास मानकतला या दोघांमध्ये जोरदार भांडण झालं होतं. अर्चना किचनमध्ये काम करत असताना विकास तिथे चहा बनवण्यासाठी येतो. या दोघांमध्ये वादाला सुरुवात होते. हे भांडण अखेर हाणामारीवर येऊन पोहोचतं. त्यानंतर अर्चना रागाच्या भरात त्याच्यावर पाणी फेकते. तिथे जवळच प्रियांका चौधरी उभी असते. या घटनेत कोणालाही दुखापत होऊ शकली असती.

वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान हा निम्रत कौरलाही समजावताना दिसतो. अब्दु जेव्हापासून पुन्हा बिग बॉस घरात आला आहे, तेव्हापासून तो निम्रत आणि साजिद खान यांच्यापासून लांबच राहतोय. यामुळे निम्रत नाराज असते. त्यामुळे वीकेंडच्या एपिसोडमध्ये सलमान निम्रतची तुलना सुम्बुलशी करताना दिसतो.

निम्रत कौर आणि अर्चना गौतमशिवाय सलमान या आठवड्यात शालीन भनोटवरही भडकतो. हा प्रोमो पाहिल्यानंतर सलमान अर्चनाला बिग बॉसच्या घराबाहेर काढणार का, असा प्रश्न चाहत्यांमध्ये उपस्थित झाला आहे.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.