AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal : राज्यपालांनी वादविवाद होईल असे वक्तव्य टाळावे; छगन भुजबळांचा सल्ला

Chhagan Bhujbal : शिंदे सरकार शपथविधीला एक महिना होऊन देखील मंत्रिमंडळ विस्तार नाही यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत. सुप्रीम कोर्टाच्या 1 तारखेच्या केसकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे हेच मुख्य कारण आहे.

Chhagan Bhujbal : राज्यपालांनी वादविवाद होईल असे वक्तव्य टाळावे; छगन भुजबळांचा सल्ला
राज्यपालांनी वादविवाद होईल असे वक्तव्य टाळावे; छगन भुजबळांचा सल्ला Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 30, 2022 | 2:43 PM
Share

नाशिक: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) यांनी वाद होईल असे वक्तव्य करणे शक्यतो टाळावे. राज्यपालांचे मुंबई बद्दलचे वक्तव्य अप्रस्तुत असून वाद नको. राज्यपालांनी नेहमी निर्विवाद असावे, असे मत राज्याचे माजी उपमख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आज नाशिक येथे पत्रकारांशी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. मुंबईत (mumbai) सर्व प्रकारचे लोक आहेत. त्यात अदानी आणि अंबानींनसारख्या उद्योगपतींना पण मुंबई आवडते. मुंबईला असलेले बंदर, व्यापार, उद्योग, विमानतळ अनेक मुंबईतील कलाकार, गुजराथी, राजस्थानी सर्व धर्मीय हे आपलेच आहेत. त्यामुळे मुंबईचे महत्व कसे कमी करता येईल? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला.

मुंबई शहराला भौगोलिक दृष्ट्या अतिशय महत्व असून ब्रिटिशांनी देखील व्यापारासाठी मुंबईला प्राधान्य दिले. मुंबादेवीचा आशिर्वाद मुंबईवर आहे. देशभरातील सगळ्यांनाच मुंबई हे आवडते शहर असून या शहरात अनेक नामवंत मान्यवर राहत असल्याने या शहराला विशेष महत्व आहे, असं भुजबळांनी सांगितलं.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. रात्री उशिरा मला मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे निमंत्रण मिळाले. पवार साहेब नाशिक दौऱ्यावर असल्याने बैठकीला जाणे शक्य होणार नाही. परंतु मुख्यमंत्र्यांनी नाशिकला भरभरून द्यावे, विकास करावा, असेही ते म्हणाले.

कोर्टाच्या निकालासाठी निकाल रखडला

शिंदे सरकार शपथविधीला एक महिना होऊन देखील मंत्रिमंडळ विस्तार नाही यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत. सुप्रीम कोर्टाच्या 1 तारखेच्या केसकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे हेच मुख्य कारण आहे. त्यामुळे ते मंत्रिमंडळ विस्तारासाठी थांबले असावेत, असे सांगत कुठले खाती घ्यायची यावरून भांडण चालू आहेत. पण मुख्य कारण सुप्रीम कोर्ट निकाल आहे, असं ते म्हणाले.

मालेगाव जिल्हा करताना अभ्यास करा

मालेगाव जिल्हा बाबत कोणताही नेता अजून बोललेला नाही. पण आपण मीडिया हुशार आहे, अनेक गोष्टी लक्षात आणून देतात. मालेगाव जिल्हा झाला तर कोणते तालुके घ्यावे? कारण कळवणचे म्हणतात आमचा आदिवासी जिल्हा करा, तर चांदवडवाले मालेगावात जायला तयार नाहीत. त्यामुळे सर्व गोष्टींचा मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करावा, लोकांचे मत बघावे आणि मग निर्णय घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.

कांदा प्रश्न मार्गी लावा

कांदा हे शेतकऱ्यांचे महत्वाचे पीक आहे. त्यामुळे कांदा प्रश्न हा अतिशय महत्वाचा असून कांद्याच्या दराबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करायला हव्यात. कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यात यावे, अतिरिक्त रेल्वे वॅगन उपलब्ध करून देण्यात यावे, याबाबत केंद्र शासनाबरोबर चर्चा करून कांद्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात यावा असे त्यांनी यावेळी सांगितले.

अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.