AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कितने आदमी थे? सरदार एकही, उसका नाम शरद पवार : भुजबळ

'कितने आदमी थे? साहब एकही था. उसका नाम शरद पवार' असा डायलॉग व्हॉट्सअॅपवर वायरल झाल्याचं छगन भुजबळ म्हणाले.

कितने आदमी थे? सरदार एकही, उसका नाम शरद पवार : भुजबळ
| Updated on: Nov 03, 2019 | 4:00 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ‘शोले’ चित्रपटातील डायलॉग मारत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत. मुख्यमंत्र्यांनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर ‘कितने आदमी थे? सरदार एकही था. उसका नाम शरद पवार’ असा डायलॉग व्हॉट्सअॅपवर वायरल झाल्याचं भुजबळ (Chhagan Bhujbal praises Sharad Pawar) म्हणाले.

अनेक जण राष्ट्रवादी पक्षाची साथ सोडून गेले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणायचे, की शरद पवार यांची परिस्थिती ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी बचे तो मेरे पिछे आओ’ अशी झाली आहे. पण लोकांनी उत्तर दिलं. ‘शोले’मधला डायलॉग व्हॉट्सअॅपवर फिरत आहे. ‘कितने आदमी थे सांबा? सरदार, एकही था. उसका नाम शरद पवार’ असा डायलॉग भुजबळांनी मारला.

शोले चित्रपटात असरानी यांनी साकारलेला जेलर ‘हम अंग्रेजो के जमाने के जेलर है’ असा डायलॉग म्हणायचा. त्यानंतर ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे आओ’ हा त्याचा डायलॉग आजही प्रचंड प्रसिद्ध आहे. तर गब्बरसिंहच्या तोंडी असलेल्या ‘अरे ओ सांबा, कितने आदमी थे सांबा?’ या संवादाचा आधार घेत भुजबळांनी फडणवीसांना टोला लगावला.

राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी काल बोलावलेल्या तातडीच्या बैठकीला छगन भुजबळ थेट रुग्णालयातून रवाना झाले होते. जसलोक हॉस्पिटलवरुन डॉक्टरांच्या परवानगीने भुजबळ बैठकीला गेले होते. उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने 31 ऑक्टोबरला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती ठीक नसतानाही भुजबळ डिस्चार्ज घेऊन थेट रवाना झाल्यामुळे ही बैठक तितकीच महत्त्वाची असल्याचं बोललं जात होतं.

साहेब, जय महाराष्ट्र! संजय राऊत यांचा अजित पवारांना मेसेज

पावसात भिजावं लागतं, याचा अनुभव आम्हाला कमी पडला, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या चातुर्यामुळे उदयनराजेंचा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्याचं अप्रत्यक्षपणे म्हटलं होतं. साताऱ्यातील प्रचारसभेत शरद पवार यांनी केलेल्या भाषणादरम्यान पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी पावसात भिजत पवारांनी भाषण सुरु ठेवलं होतं. भाजपवासी झालेल्या उदयनराजे यांना राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आता छगन भुजबळांनी पवारांवर स्तुतिसुमनं (Chhagan Bhujbal praises Sharad Pawar) उधळली आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.