AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरन्यायाधीश रमणा यांचा अखेरचा दिवस, ओपन कोर्टात वरिष्ठ वकील दुष्यंत दवे यांना अश्रू अनावर, रडत रडत म्हणाले..

अखेरच्या भाषणात त्यांनी पेंडन्सी (खटल्यांची संख्या) हे सर्वात मोठ आव्हान असल्याचे सांगितले आहे. तसेच लिस्टिंगमध्ये जास्त लक्ष देऊ शकलो नाही, असेही त्यांनी सांगितले. व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि आर्टिफिशियल एंटिलिजेन्स तैनात करण्याची आवश्यकता आहे. मात्र हे बाजारातून खरेदी करता येणार नाही असेही रमणा यांनी स्पष्ट केले. रमणा म्हणाले की असे अनेक मुद्दे आहेत, ज्यावर ते प्रश्न उपस्थित करु इच्छितात. मात्र पद सोडण्यापूर्वी त्यावर बोलणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

सरन्यायाधीश रमणा यांचा अखेरचा दिवस, ओपन कोर्टात वरिष्ठ वकील दुष्यंत दवे यांना अश्रू अनावर, रडत रडत म्हणाले..
मुख्य न्यायमूर्तींची निवृत्ती Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Aug 26, 2022 | 2:49 PM
Share

नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती एन व्ही रमणा (CJI N V Ramana)हे शुक्रवारी रिटायर (retired)झाले. आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या दोन दिवसांत त्यांनी महत्त्वाच्या प्रकरणांची (important cases)सुनावणी केली. सेरेमोनियल बेंचमध्ये त्यांच्या निरोप समारंभात अटर्नी जनरल केके वेणूगोपाल म्हणाले की, रमणा यांच्या निवृत्तीमुळे आम्ही एक बुद्धिजीवी आणि एक उत्कृष्ट न्यायाधीश गमावला आहे. तर वरिष्ठ वकील दुष्य़ंत दवे यांनी कोर्टातच रडण्यास सुरुवात केली. तेो म्हणाले की, रमणा हे जनतेचे न्यायाधीश आहेत. सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले की मुख्य न्यायमूर्तींचे सेरेमोनियल बेंचमधून लाईव्ह स्ट्रिमिंग झाले. ज्याचे सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर वेबकास्ट करण्यात आले.

शेवटच्या दोन दिवसांत या प्रकरणांची सुनावणी

  1. कर्नाटक कोल मायनिंग – कर्नाटकात बेल्लारी, चित्रदुर्ग आणि तुमकरु जिल्ह्यांतील खाणींच्या फर्मना आयर्न आणि मायनिंगची मर्यादा वाढवली.
  2. फुकट देणाऱ्या निवडणुकांच्या घोषणांना ३ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे रेफर करण्यात आले.
  3. गोरखपूर दंगल प्रकरण- 2007 च्या हेट स्पीच प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात खटला चालवण्यास परवानगी मागणारी याचिका फेटाळली
  4. पेगासस – समितीला पाच फोनमध्ये मालवेअर सापडले, मात्र ते पेगासस होते, हे स्पष्ट नाही. यात सरकारने मदत केली नाही, असे समितीने स्पष्ट केले. पुढील सुनावणी सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्य़ात होणार
  5. बिल्कीस बानो- या प्रकरणात गुजरात सरकारला नोटीस देण्यात आली. 11 दोषींना यात पक्षकार करण्याचे आदेश देण्यात आलेत. याची पुढील सुनावणी सप्टेंबरमध्ये होणार
  6. पीएमएलए- रिव्ह्यू पिीशनवर केंद्र सरकतारला नोटीस देण्यात आली. त्याचबरोबर हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे, असे नमूद करण्यात आले. यातील दोन पैलू हे विचार करण्यासारखे आहे, असे सांगण्यात आले. त्यातील एक ईडीकडून दाखल होणारी एफआयआरची कॉपी आरोपीला न देण्याची तरतूद आणि स्वताला निर्दोष करण्याची जबाबदारी आरोपीवर असण्याची तरतूद
  7. पंतप्रधान मोदी सुरक्षेत अडथळा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत अडथळा निर्माण झाल्याच्या प्रकरणात, तपास समितीने कोर्टात सांगितले की फिरोजपूर पोलीस अधिकारी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात आणि ड्युटी करण्यात असफल राहिले.

रजिस्ट्रीच्या पद्धतीवर नाराज रमणा

एन व्ही रमणा 16 खंडपीठातील सुनावणीसाठी मास्टर ऑफ रोस्टर केस डिस्ट्रीब्युट करीत होते. मात्र गेल्या काही दिवसांत खटल्यांचे लिस्टिंग होत असताना, सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीसमोर ते हतप्रभ असल्याचे दिसून आले. 17 ऑगस्ट रोजी सुनावणीसाठी असलेली एक लिस्टेड केस रजिस्ट्रीने हटवली होती. त्यावर रमणा चांगलेच नाराज झाले होते. त्यावर निवृत्तीच्या भाषणात बोलेन असे ते म्हणाले होते. मात्र अखेरच्या भाषणात त्यांनी पेंडन्सी (खटल्यांची संख्या) हे सर्वात मोठ आव्हान असल्याचे सांगितले आहे. तसेच लिस्टिंगमध्ये जास्त लक्ष देऊ शकलो नाही, असेही त्यांनी सांगितले. व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि आर्टिफिशियल एंटिलिजेन्स तैनात करण्याची आवश्यकता आहे. मात्र हे बाजारातून खरेदी करता येणार नाही असेही रमणा यांनी स्पष्ट केले. रमणा म्हणाले की असे अनेक मुद्दे आहेत, ज्यावर ते प्रश्न उपस्थित करु इच्छितात. मात्र पद सोडण्यापूर्वी त्यावर बोलणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.