मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दाैऱ्यावर, ठाकरे आणि शिंदे गटाचे मंत्री एकाच मंचावर येणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दाैऱ्यावर, ठाकरे आणि शिंदे गटाचे मंत्री एकाच मंचावर येणार
एकनाथ शिंदे आणि राजन साळवी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 12:56 PM

मुंबई,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उद्या रत्नागिरी दाैऱ्यावर (Ratnagiri) असणार आहेत. जिल्हातील 750 काेटी रूपयांच्या विकास कामांच्या शुभारंभ आणि भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव यांनादेखील निमंत्रण देण्यात आलेले आहे. याशिवाय नऊ मंत्र्यानादेखील या साेहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेमधून वेगळे झाल्यानंतर दाेनीही गटांमध्ये टाेकाचे वाद निर्माण झाले आहे. विषेशतः खासदार संजय राऊत यांच्यावर झालेली कारवाई आणि राज्यपाल भगतसिंह काैशारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिंदे-भाजप सरकारवर सातत्याने टिका हाेत आहे.

या विकासकामांचे हाेणार आहे शुभारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या रत्नागीरी येथे थ्रिडी अॅक्टिव्ह तारांगणाचा शुभारंभ हाेणार आहे. हे तारांगण राज्यातील पहिले थ्रिडी तारांगण असणार आहे. 65 आसणांची क्षमता असलेल्या या वातानुकूलीत तारांगणात अनेक साेयी पुरविण्यात आल्या आहेत. हे तारांगण खगाेलप्रेमींसाठी परवणी ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

तब्बल 10 काेटी रूपये खर्च करून हे भव्य तारांगण बणविण्यात आले आहे. या तारांगणामुळे काेकणाच्या पर्यटणालादेखील चालना मिळणार आहे. याशिवाय इतरही अनेक विकास कामांचे भुमीपूजन हाेणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ठाकरे गटातील आमदारांनादेखील निमंत्रण आहे.

टाेकाचे मतभेद असताना या दाेनीही गटाचे नेते एकत्र येतील का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. विषेश म्हणजे महाविकास आघाडीने सरकार विराेधात भव्य मोर्चाची घाेषणा केली आहे, मात्र या माेर्चाला पाेलिस विभागाकडून अद्याप परवाणगी देण्यात आलेली नसल्याने महाविकास आघाडिची काेंडी झालेली आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.