मुंबई : दसऱ्याच्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थवर दसरा मेळावा झाला. तर शिंदेगटाचा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा झाला. यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांवर टीका केली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या लहान मुलावर उद्धव ठाकरेंनी टीका केली. दीड वर्ष वय असणाऱ्या रुद्रांशवर टीका केल्याने अनेकांनी त्याचा निषेध केला. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही यावर भाष्य केलंय. “शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं, तुम्ही तर तेही विसरलात”, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे.