AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“शिवसेनेत घेतलं नाही म्हणून चित्रा वाघ यांची आगपाखड,” शिवसेनेच्या मनिषा कायदेंचा जोरदार टोला

चित्रा वाघ यांना शिवसेनेत प्रवेश करायचा होता. पण त्यांचा प्रवेश शिवसेनेने नाकारला, असा गौप्यस्फोट शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केला

शिवसेनेत घेतलं नाही म्हणून चित्रा वाघ यांची आगपाखड, शिवसेनेच्या मनिषा कायदेंचा जोरदार टोला
Chitra-Wagh
| Edited By: | Updated on: Aug 04, 2021 | 11:21 PM
Share

मुंबई : “चित्रा वाघ यांना शिवसेनेत प्रवेश करायचा होता. पण त्यांचा प्रवेश शिवसेनेने नाकारला. म्हणूनच त्या शिवसेनेवर आगपाखड करत आहेत,” असा गौप्यस्फोट शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी केला. तसेच त्यांनी आपल्या काही गोष्टी झाकण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला, असा टोलादेखील त्यांनी लगावला. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या अग्रलेखातून बीफच्या मुद्द्यावरुन भाजपवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर पलटवार केला. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या याच टीकेला उत्तर देताना मनिषा कायंदे यांनी वरील भाष्य केले. (Chitra Wagh wanted to join Shiv Sena But denied his entry said Shiv Sena leader Manisha Kayande)

भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आटापीटा

यावेळी बोलताना मनिषा कायंदे यांनी चित्रा वाघ यांना चांगलंच लक्ष्य केलं. “चित्रा वाघ यांची नेमकी पोटदुखी काय आहे ? असं आहे की, चित्रा वाघ यांना शिवसेनेत प्रवेश करायचा होता. पण त्यांचा प्रवेश शिवसेनेने नाकारला. म्हणून त्या शिवसेनेवर आगपाखड करत आहेत. त्यांनी आपलं काही झाकण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांचा हा आटापीटा चालला आहे,” अशी बोचरी टीका मनिषा कायंदे यांनी केली.

तसेच पुढे बोलताना “शिवसेनेच्या एकाही नेत्याने अद्याप बीफचे समर्थन केलेले नाही. पण भाजपच्या नेत्यांची बीफचं समर्थन करणारी यादी भलीमोठी आहे. ती यादी चित्रा वाघ यांनी शोधावी. काहीतरी बोलायचं आणि मोठ्या माणसांचं नाव घ्यायचं. हे सवंग प्रसिद्धीसाठी होत असून त्यांची आता सवय झाली आहे,” असे उपरोधिक भाष्य कायंदे यांनी केले.

चित्रा वाघ काय म्हणाल्या होत्या ?

सोनियासेना प्रवक्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्याने त्यांचा केंद्रसरकारबद्दलचा द्वेष उफाळून येणारच होता. म्हणूनच आपलं पगारी काम निभावण्यासाठी त्यांना आज हतबलतेने बीफचेही समर्थन करावं लागतंय. मागील 2 वर्षात ठाकरे सरकारने ‘फटे लेकीन हटे नही’चे धोरण कसं राबवलं ते जनतेला माहिती आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

सामनामध्ये बीफवर काय भाष्य करण्यात आलं ?

‘बीफ’वरुन ‘मोदी-1’ सरकारच्या काळात जे झुंडबळी गेले, ते मानवतेस काळिमा फासणारे प्रकार होते. मेघालयचे भाजपचे मंत्री सनबोर शुलाई यांनी ‘ बीफ’ खाण्याचे समर्थन केलंय. बीफवरची बंदी उठली काय? सनबोर शुलाई यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा वगैरे दाखल करा, अशी मागणी आम्ही करणार नाही, पण ‘बीफ’ प्रकरणी ज्यांचे ‘झुंडबळी’ गेले, बीफ बाळगले म्हणून ज्यांना अपमानित ठरवून गुन्हे दाखल केले गेले, त्या सगळ्यांची माफी मागा! , अशी मागणी 3 ऑगस्टच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली होती.

इतर बातम्या :

Video : चिमुकल्याला वाचवताना साक्षीनं पाय गमावला; महाराजांच्या पोशाखात अमोल कोल्हेंचा साक्षीला त्रिवार मुजरा

शेताच्या बांधावर खोदकाम, अचानक वाद उफाळला, दोन शेतकरी आमनेसामने, थेट गोळीबार, लातूरमधील भयानक घटना

(Chitra Wagh wanted to join Shiv Sena But denied his entry said Shiv Sena leader Manisha Kayande)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.