कोलकात्यात अमित शाहांच्या रोड शोमध्ये हिंसाचार

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:20 PM, 14 May 2019

कोलकाता : लोकसभा निवडणुकीसाठी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 19 मे रोजी मतदान पार पडणार आहे. यापूर्वीच पश्चिम बंगालमधील कोलकात्यात प्रचाराने पातळी सोडून टोक गाठलं आहे. कारण प्रचारादरम्यान हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. आजही कोलकात्यात भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले.

कोलकात्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा रोड शो निघाला होता. या रोड शोमध्येच हिंसाचार झाला. जाळपोळ आणि दगडफेकही झाली.

अमित शाह यांचा रोड शो कोलकाता युनिव्हर्सिटीजवळून जात असताना, कॉलेज हॉस्टेलमधून दगडफेक सुरु झाली. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी हॉस्टेलला घेराव घातला.

पोलिसांनी जाळपोळ, दगडफेक करणाऱ्यांवर लाठीमार सुरु केला. त्यामुळे हिंसाचार आणखी भडकला. विशेष म्हणजे, हिंसाचारानंतरही अमित शाह यांचा रोड शो सुरुच होता. शाहांच्या रोड शोपूर्वी भाजपचे बॅनर्सही फाडण्यात आले होते.