ज्यांचं नेतृत्व महाराष्ट्राने नाकारलं, त्यांच्यावर सूड घेऊन कोणता लाभ? मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला

| Updated on: Aug 23, 2019 | 8:33 AM

राज ठाकरेंशी सूडबुद्धीने वागून आम्हाला कोणताही लाभ नाही. ईडीच्या कारवाईशी भाजपचा कोणताही संंबंध नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं

ज्यांचं नेतृत्व महाराष्ट्राने नाकारलं, त्यांच्यावर सूड घेऊन कोणता लाभ? मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला
Follow us on

मुंबई : ज्यांचं नेतृत्व महाराष्ट्राने नाकारलं, त्यांच्यावर सूड घेऊन कोणता लाभ आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या झालेल्या ईडी (ED) चौकशी प्रकरणी टोला लगावला आहे. कोहिनूर मिल व्यवहार (Kohinoor Mill) प्रकरणी राज ठाकरे यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून काल (गुरुवारी) नऊ तास चौकशी करण्यात आली होती.

‘गेल्या पाच वर्षात त्यांचा (राज ठाकरे) पक्ष संपत गेला. आधी गेल्या लोकसभेत (2014) काहीच नाही, मग विधानसभेत (2014) त्यांची एक जागा आली, तोही आमदार शिवसेनेत गेला. महापालिकेत नाशिक त्यांच्याकडे होती, तिथेही दोघेच जण निवडून आले. इतर कुठल्याही महापालिकेत त्यांची लोकं निवडून आली नाहीत. जिल्हा परिषदेत कोणी आलं नाही, नगरपालिकेत कोणी आलं नाही.’ असा पाढा मुख्यमंत्र्यांनी वाचला.

‘या लोकसभेत इतकी टोकाची भूमिका राज ठाकरेंनी घेतली. स्टार प्रचारक बनले. वाटेल तसं बोलले. कुठल्याही स्तरावर जाऊन बोलले. तरी देखील त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मग ज्यांचं नेतृत्व महाराष्ट्राने नाकारलं आहे. ज्यांच्या नेतृत्वाला कोणीही समर्थन द्यायला तयार नाही. त्यांच्याविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई करुन आम्हाला कोणता लाभ आहे. मी प्रॅक्टिकल विषय सांगतो. म्हणजे आम्ही लाभ असला, तरी करणार नाही. पण सांगा आम्हाला काय लाभ आहे?’ असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीसांनी विचारला.

‘राज ठाकरेंजवळ योग्य कागदपत्रं असतील, तर ते देतील. आणि त्यांचं म्हणणं ईडी ऐकतील. नसतील तर ईडी कारवाई करेल. त्याच्यात भाजपला, आम्हाला गोवण्याचं काही कारण नाही.’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी हात वर केले.


राज ठाकरेंची नऊ तास चौकशी

सकाळी 11.30 वाजता सुरु झालेली चौकशी रात्री 8 वाजेपर्यंत चालली. कितीही चौकशा केल्या, तरी तोंड बंद ठेवणार नाही, ही राज ठाकरेंची कार्यकर्त्यांसमोरची पहिली प्रतिक्रिया होती. राज ठाकरेंचे कुटुंबीय जवळपास दोन तासांपासून बाहेर वाट पाहत होते. सकाळी राज ठाकरेंना सोडण्यासाठी आलेले कुटुंबीय बाजूच्याच हॉटेलमध्ये थांबले.

9 नंबरची गाडी, 9 तास चौकशी आणि 9 वाजता घरी

राज ठाकरे सकाळी त्यांच्या 9 या लकी क्रमांकाच्या गाडीत बसून ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झाले होते. यानंतर त्यांची चौकशीही 9 तास चालली आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतर ते रात्री 9 वाजता घरी पोहचले. असा नऊचा योगायोग पाहायला मिळाला.

संबंधित बातम्या :

कितीही चौकशी करा, तोंड बंद ठेवणार नाही, राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : 9 तास चौकशी, फक्त हात जोडून राज ठाकरे रवाना

तुमच्या कार्यकर्त्यांनी मला ट्रोल केलं, अंजली दमानियांचा राज ठाकरेंना मेसेज

राज ठाकरे पत्नी मुलाला घेऊन चौकशीला चाललेत की सत्यनारायण पूजेला? : अंजली दमानिया

रक्ताचं नातं पाठिशी, उद्धव ठाकरे राज यांच्यासोबत : संजय राऊत

सर्व कुटुंब ईडी कार्यालयाकडे, मात्र राज ठाकरेंची ‘थिंक टँक’ आणि ‘उजवा हात’ कृष्णकुंजवर

Raj Thackeray | राज ठाकरे 10.30 वा 9 नंबरच्या गाडीत बसले, मागेही 9 नंबरची गाडी, मागच्या गाडीत कोण-कोण?

Raj Thackeray | आईच्या डोळ्यात अश्रू, हात धरुन राज ठाकरेंना गाडीपर्यंत सोडलं

राजकारणापलिकडचा नात्याचा ओलावा, उद्धव ठाकरे भावाच्या पाठीशी

मनसैनिक प्रवीण चौगुलेच्या आत्महत्येमागील तथ्य पोलिसांनी सांगितलं

राज ठाकरेंसाठी मनसैनिक जेव्हा रस्त्यावर उतरतात….

ईडी चौकशीतून काही निघणार नाही, उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंची पाठराखण

22 ऑगस्टला शांतता राखा, ईडी ऑफिसबाहेर जमू नका, राज ठाकरेंचं आवाहन