राज ठाकरे पत्नी मुलाला घेऊन चौकशीला चाललेत की सत्यनारायण पूजेला? : अंजली दमानिया

राज ठाकरे पत्नी मुलाला घेऊन चौकशीला चाललेत की सत्यनारायण पूजेला? : अंजली दमानिया

याविषयी टीव्ही 9 मराठी शी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, "राज ठाकरेंची कसून चौकशी झाली पाहिजे. जी वागणूक सर्वसामान्यांना ईडी कार्यालयात मिळेत, तीच त्यांनाही मिळाली पाहिजे असे मला वाटते."

Namrata Patil

|

Aug 22, 2019 | 1:13 PM

मुंबई : कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी (Kohinoor Square) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ईडीने नोटीस बजावली आहे. या प्रकरणी राज ठाकरे आज (22 ऑगस्ट) ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे. मात्र राज यांच्या ईडी चौकशीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania)  यांनी टीका केली आहे. राज ठाकरे(Raj Thackeray) सहकुटुंब ईडीच्या चौकशीला निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला? अशी टीका अंजली दमानिया यांनी केली आहे.

राज ठाकरे सकाळी 10.30 च्या सुमारास कृष्णकुंज निवासस्थानातून ईडी कार्यालयासाठी रवाना झाले. राज ठाकरेंसोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगी उर्वशी ठाकरे, मुलगा अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे-बोरुडे हेही ईडी कार्यालयात गेले आहेत. यावरुनच अंजली दमानिया यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज ठाकरेंवर टीका केली.

“राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा drama? का सहानुभूती गोळा करण्याचा हा प्रयत्न”, असे ट्विट अंजली दमानिया यांनी केले आहे.

याविषयी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, “राज ठाकरेंची कसून चौकशी झाली पाहिजे. जी वागणूक सर्वसामान्यांना ईडी कार्यालयात मिळेत, तीच त्यांनाही मिळाली पाहिजे असे मला वाटते.”

राज ठाकरे यांची सूडबुद्धीने चौकशी केली जातं आहे असा आरोपावर दमानिया म्हणाल्या, “ही चौकशी कधीही केली तरी लोक तेच म्हणणार होते. ते ईडीच्या चौकशीला जाताना पत्नी, मुलगा, मुलगी, सून, बहिण अशा सर्व कुटुंबाला घेऊन गेले आहेत, म्हणूनच मी ते ट्विट केले. हे सर्व सूडबु्द्धीने राज ठाकरेंवर होत असेल, पण हल्ली ते विरोधात खूप बोलायला लागले होते.”

“मला वैयक्तिक कोणी विचारलं तर मी हेच सांगेन हे खरंतर हे आधीच व्हायला हवं ते आज झालं, याचं मी अभिनंदन करते असेही अंजली दमानिया यावेळी म्हणाल्या.”


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें