ईडी चौकशीतून काही निघणार नाही, उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंची पाठराखण

ईडीकडून राज ठाकरेंची चौकशी होणार आहे, याबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला असता त्या चौकशीतून काय निघेल, असं वाटत नाही. त्यामुळे आपण एक-दोन दिवस थांबायला हवं, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे पाठराखण केली.

ईडी चौकशीतून काही निघणार नाही, उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंची पाठराखण
Follow us
| Updated on: Aug 21, 2019 | 1:40 PM

मुंबई : कोहिनूर व्यवहार (Kohinoor) प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी होण्याच्या पार्श्वभूमीवर राज यांचे चुलत बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अप्रत्यक्ष पाठराखण केली आहे. मला वाटत नाही, त्या चौकशीतून काय निघेल, एक-दोन दिवस थांबायला हवं, असं म्हणत राज ठाकरे निर्दोष सिद्ध होतील, असा विश्वासच एकप्रकारे उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेला दिसत आहे.

ईडीकडून राज ठाकरेंची चौकशी होणार आहे, याबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. ‘मला वाटत नाही, त्या चौकशीतून काय निघेल, त्यामुळे आपण एक-दोन दिवस थांबायला हवं. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं द्यायला मी काही तज्ज्ञ नाही’ असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं. शरद पवार यांनी लग्न लावून दिलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांच्या शिवसेना प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंनी याविषयी उत्तर दिलं.

राज ठाकरे यांना ‘कोहिनूर’ प्रकरणी चौकशीसाठी 22 ऑगस्ट (उद्या) ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सुपुत्र उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय राजन शिरोडकर या प्रकरणात ईडीच्या रडारवर आहेत. उन्मेष जोशी यांची सोमवार आणि मंगळवार असे सलग दोन दिवस ईडी कार्यालयात आठ-आठ तास चौकशी करण्यात आली होती. तर शिरोडकरांचीही जोशींसोबत मंगळवारी आठ तास चौकशी झाली. बुधवारी पुन्हा दोघांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आलं.

राज ठाकरेंचं खरं नाव तुम्हाला माहित आहे का?

राज ठाकरे यांना उद्या सकाळी साडेदहा वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनसेकडून ठाणे बंदचा इशारा देण्यात आला होता, मात्र ‘सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही आणि सामान्य जनतेला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या. तुम्हाला डिवचयचा प्रयत्न होणार पण तरीही तुम्ही शांत रहा.’ असं आवाहन राज ठाकरेंनी केल्यानंतर कार्यकर्ते काहीसे शांत झाले.

यापूर्वी, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही ईडीच्या चौकशी प्रकरणी सरकारवर ताशेरे ओढले. आम्हाला याची सवय आहे. सरकारचं आमच्यावर खूप प्रेम आहे, अशी तिरकस प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. राज ठाकरे यांनी मात्र वेळ आल्यावर प्रतिक्रिया देणार असल्याचं म्हटलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

कोहिनूर सीटीएनएल (Kohinoor CTNL) ही उन्मेष जोशी (Unmesh Joshi) यांच्या मालकीची कंपनी आहे. उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय राजन शिरोडकर हे 2008 पर्यंत ‘कोहिनूर CTNL’ कंपनीचे शेअर होल्डर (भागीदार) होते. त्यांनी कोहिनूर मिल नंबर 3 ही जागा 2003 मध्ये लिलाव पद्धतीने 421 कोटींना खरेदी केली होती.

या जमिनीवर ‘कोहिनूर स्क्वेअर’ ही बहुमजली इमारत उभारण्यात येत आहे. या कंपनीत सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (आयएल अँड एफएस – IL&FS) 225 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

राज ठाकरेंना ईडीची नोटीस, ठाण्यात मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या

मात्र 2008 मध्ये IL&FS ने मोठं नुकसान सहन करत आपले 225 कोटी रुपयांचे सर्व शेअर्स केवळ 90 कोटींना कोहिनूर CTNL ला देऊन टाकले. त्याचवेळी राज ठाकरेंनीही आपले सर्व शेअर कंपनीला विकले आणि ते कंपनीतून बाहेर पडले.

आपले शेअर्स दिल्यानंतरही IL&FS या सरकारी कंपनीने उन्मेष जोशींच्या कोहिनूर सीटीएनएल कंपनीला अडव्हान्स लोन अर्थात आगाऊ कर्ज दिलं. ते कर्जही कोहिनूर सीटीएनएल कंपनी भागवू शकली नाही.

वर्ष 2011 मध्ये कोहिनूर सीटीएनएलने आपली काही मालमत्ता विकून 500 कोटी रुपयांचं कर्ज भागवण्यासाठी IL&FS सोबतच्या करारावर सह्या केल्या. या करारानंतरही IL&FS या कंपनीने पुन्हा कोहिनूर सीटीएनएल कंपनीला आणखी 135 कोटी रुपयांचं कर्ज दिलं.

संबंधित बातम्या :

स्पेशल रिपोर्ट – किणी ते कोहिनूर : 23 वर्षात राज ठाकरेंची कोणकोणती चौकशी?

Unmesh Joshi | ईडीच्या नोटीसमध्ये भेटायला या एवढंच आहे : उन्मेष जोशी

आतापर्यंत आवाज पाहिला, आता शांततेची ताकद दाखवू, मनसेचं 22 ऑगस्टला शक्तीप्रदर्शन

नरेंद्र मोदी नवीन भारताचे नवीन हिटलर : मनसे

चूक नाही तर घाबरता का? कायदा हाती घेतला तर कारवाई निश्चित : मुख्यमंत्री

ED आणि CBI या तपास यंत्रणा आहेत की मोदी-शाहांचे कार्यकर्ते? : राजू शेट्टी

कोहिनूर प्रकरणी राज ठाकरेंना ईडीची नोटीस

राज ठाकरेंना ED नोटीस, मनसे एक्स्प्रेस वे रोखणार, ठाणे बंदचाही इशारा

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.