राज ठाकरेंना ईडीची नोटीस, ठाण्यात मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ((Raj Thackeray) ) यांना ईडी नोटीस पाठवल्याच्या कारणामुळे ठाण्यातील एका मनसे कार्यकर्त्याने आत्महत्या केली आहे.

राज ठाकरेंना ईडीची नोटीस, ठाण्यात मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ((Raj Thackeray) ) यांना ईडी नोटीस पाठवल्याच्या कारणामुळे ठाण्यातील एका मनसे कार्यकर्त्याने आत्महत्या केली आहे. प्रवीण चौगुले (Pravin Chowgule) असे या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी 20 ऑगस्टला रात्री उशिराही ही घटना घडली आहे. प्रवीण हा मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांचा जवळचा होता.

प्रवीण हा ठाण्यातील विटावा भागात राहत होता. “राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आली आहे. त्यामुळे त्यांना चौकशीला सामोरे जावं लागणार आहे. यामुळे मी दु:खावलो असून आत्महत्या करतोय,” असं प्रवीणने त्याच्या मित्रांना आत्महत्येपूर्वी सांगितले होते. त्यानंतर त्याने स्वत:ला पेटवून घेतले. त्याने आत्महत्या केल्याचे कळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचा मृतदेह कळव्यातील शिवाजी रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.

एवढंच नव्हे तर काल दिवसभरात त्याने त्याच्या फेसबुकवर राज ठाकरेंच्या समर्थनात आणि ईडीच्या विरोधात अपसब्द वापरुन हजारो पोस्ट लिहिल्या आहेत.

प्रवीण हा ठाण्यातील कट्टर मनसैनिक होता. मनसेच्या अनेक कार्यक्रमात, मोर्चा किंवा आंदोलनात प्रवीण सहभागी असायचा. प्रत्येक मोर्चात प्रविण मनसेचा झेंडा त्याच्या शरीरावर रंगवायचा. तसेच स्थानिक नेत्यांच्याही तो फार जवळचा होता. त्याने फेसबुकवर मनसेच्या नेत्यांसोबत फोटो पोस्ट केले आहेत. त्याच्या आत्महत्येमुळे मनसैनिकांना फार मोठा धक्का बसला आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ईडीने कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी नोटीस पाठवली आहे. त्यांना येत्या 22 ऑगस्टला राज ठाकरे यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. या प्रकरणामुळे मनसेच्या अनेक कार्यकर्त्यामध्ये संताप पाहायला मिळत आहे. तसेच येत्या 22 ऑगस्टला मनसेचे कार्यकर्ते आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.

संबंधित बातम्या :

स्पेशल रिपोर्ट – किणी ते कोहिनूर : 23 वर्षात राज ठाकरेंची कोणकोणती चौकशी?

Unmesh Joshi | ईडीच्या नोटीसमध्ये भेटायला या एवढंच आहे : उन्मेष जोशी

आतापर्यंत आवाज पाहिला, आता शांततेची ताकद दाखवू, मनसेचं 22 ऑगस्टला शक्तीप्रदर्शन

नरेंद्र मोदी नवीन भारताचे नवीन हिटलर : मनसे

चूक नाही तर घाबरता का? कायदा हाती घेतला तर कारवाई निश्चित : मुख्यमंत्री

ED आणि CBI या तपास यंत्रणा आहेत की मोदी-शाहांचे कार्यकर्ते? : राजू शेट्टी

कोहिनूर प्रकरणी राज ठाकरेंना ईडीची नोटीस

राज ठाकरेंना ED नोटीस, मनसे एक्स्प्रेस वे रोखणार, ठाणे बंदचाही इशारा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *