सध्या मंत्रिमंडळ फुल्ल… नो व्हॅकन्सी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कुणाला टोला?

Devendra Fadnavis : मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगली जिल्ह्यांतील ईश्वरपूर येथे उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या एका विधानाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

सध्या मंत्रिमंडळ फुल्ल... नो व्हॅकन्सी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कुणाला टोला?
Devendra Fadnavis
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 01, 2025 | 4:17 PM

राज्यातील नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचा प्रचार अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. सर्वत पश्राचे नेते पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगली जिल्ह्यांतील ईश्वरपूर येथे उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या एका विधानाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. माझ्या मंत्रिमंडळात कुठलीही जागा नाही असा टोला त्यांनी एका नेत्याला लगावला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ईश्वरपूरचा विकास करणार

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मला अतिशय आनंद आहे या शहराचं नाव बदलून ईश्वरपूर झालं आहे यानंतर मी पहिल्यांदा आलोय. पहिल्यांदा नाव बदलून ईश्वरपूर केलं, त्यानंतर लोक आमच्याकडे आले आम्ही मग उरूण ईश्वरपूर केलं. आता आम्ही तुमच्याकडे आलोय नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक पदाचे आमचे उमेदवार निवडून द्या. आम्ही उरुण ईश्वरपूर हे सांगली जिल्ह्यातले सर्वात विकसित शहर करू.’

मंत्रिमंडळ फुल आहे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या काही महिन्यांपूर्वी रंगली होती. यावरून जयंत पाटील यांना टोला लगावताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘आता मंत्रिमंडळ फुल आहे. सध्या व्हॅकन्सी नाही. एकच गोष्ट सांगतो, माझ्या मंत्रिमंडळात कुठलीही जागा नाही. नव्याने मागण्या करू नका. बाहेरच्याला मंत्रीपद देणार नाही. कोणालाही मंत्री पद मिळणार नाही.’

2014 नंतर शहरांचा विकास

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘आधी या देशात राजेशाही होती, राणीच्या पोटातून मुलगा बाहेर आला की तो राजा होत असे, पण आता संविधान आल्यानंतर ती व्यवस्था बदलली, मताच्या पेटीतून आता राजा होतोय. आपल्या देशात गावकेंद्रीत व्यवस्थित होती. 65 वर्षात भारतात केंद्राकडे शहरांच्या विकासाकरिता कोणत्या योजना नव्हत्या. त्यामुळे देशातल्या शहरांचा विकास होऊ शकला नाही. 2014 नंतर मोदी पंतप्रधान बनले. शहरांचा चित्र बदललं पाहिजे, शहरांमध्ये सोयी दिल्या पाहिजे. त्यामुळे देशात पहिल्यांदा स्मार्ट सिटी अमृत योजना स्वच्छ भारत शहरी योजना अशा वेगवेगळ्या योजना तयार केल्या. लाखो कोटी रुपये निधी मोदी सरकारने शहरांना द्यायला सुरुवात केली.’

मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, ‘शहरातील घनकचरा म्हणजे डोक्यावर ताण असायचा, आता महाराष्ट्रात 300 पेक्षा जास्त शहरांमध्ये घनकचऱ्याचे व्यवस्थापन आपण करतोय. घनकचरा आज संपत्ती झाला आहे, घनकचरा व्यवस्था करून घनकचऱ्याच्या माध्यमातून कोळसा आणि खतं तयार केली जात आहेत. कचऱ्याद्वारे मोठ्या महापालिकांमध्ये गॅस आणि विद्युत निर्मिती करण्यात आली आहे. ईश्वरपूर शहरासाठी भविष्यात रिंग रोड तयार करून वाहतूक प्रश्न दूर करू. या शहराला वेगवेगळ्या पद्धतीने कसं विकसित करता येईल याचा प्लॅन आपल्याकडे आहे.