AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

⁠Maharashtra Local Body Elections 2025 : निवडणूक कार्यकर्त्यांची, मग नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमदार, खासदारांचे नातेवाईक कसे? एकदा फक्त ही लिस्ट बघा

⁠Maharashtra Local Body Elections 2025 : महाराष्ट्रात उद्या नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्या तरी बहुतांश ठिकाणी नेत्यांच्याच नातेवाईकांना संधी मिळाली आहे. त्या लिस्टवर एकदा नजर मारा.

⁠Maharashtra Local Body Elections 2025 : निवडणूक कार्यकर्त्यांची, मग नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमदार, खासदारांचे नातेवाईक कसे? एकदा फक्त ही लिस्ट बघा
Maharashtra Local Body Elections 2025
| Updated on: Dec 01, 2025 | 3:02 PM
Share

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हटल्या जातात. महाराष्ट्रात येत्या 2 डिसेंबरला म्हणजे उद्या नगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 3 डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज स्वत: म्हणाले की, “या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. जे कार्यकर्ते आपल्यासाठी निवडणुकीत फिरतात, त्यांच्यासाठी आपण फिरायचं नाही, मदत करायची नाही हे योग्य नाही” या कार्यकर्त्यांसाठी नेत्यांनी स्वत: प्रचार केला पाहिजे हा त्यांचा मुद्दा होता. तो योग्य सुद्धा आहे. आता प्रश्न हा निर्माण होतो की, या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. मग, नगराध्यक्ष पदासाठी आमदार-खासदारांच्या घरातल्या व्यक्ती का?. त्यांचे नातेवाई का? या स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्ये आपण नेत्यांच्याच कुटुंबियांना संधी देत असू तर राजकारणारतली घराणेशाही संपणार कशी?.

या नगरपालिका, नगर पंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांमधून उद्याचं नेतृत्व आकाराला येतं. याच निवडणुकातून घडलेल्या नेत्यांनी पुढे जाऊन महाराष्ट्राच मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. विलासराव देशमुख ते नारायण राणे अशी मोठं नाव यामध्ये आहेत. हे नेते याच स्थानिक पातळीवरील निवडणुकांमधून घडले. पुढे जाऊन त्यांनी महाराष्ट्राच नेतृत्व केलं. आता स्थानिक नगरपालिका, नगरपरिषदेत कुठल्या नेत्यांच्या नातेवाईकांना संधी दिलीय? त्यावर एकदा नजर मारुया.

कुठल्या नगर परिषद, नगर पंचायतीत नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी?

नाशिक भगुर येथील शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकरांनी भरला अर्ज

सिन्नर खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका हेमंत वाजे यांनी भाजपमध्ये येऊन मिळवली नगराध्यक्ष पदाची उमेदवारी.

जामनेर गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत.

चाळीसगाव भाजपकडून आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांना उमेदवारी.

संगमनेपर सत्यजीत तांबेंची पत्नी मैथिली तांबे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी, आई दुर्गाताई तांबेंचा अर्ज दाखल.

नुंदरबार-दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेसाठी रावलांच्या आईचा अर्ज

भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नीने नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

पाचोरा किशोर पाटील यांच्या पत्नी सुनिता पाटील यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील यांची मुलगी संजना पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरला.

नंदूरबार आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या पत्नी रत्ना रघुवंशी मैदानात

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.