पवार कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष, मात्र त्यांनी तयार केलेले पैलवानच पळून गेले : मुख्यमंत्री

हर्षवर्धन पाटील, गिरीश महाजन आणि आपण त्रिशुळासारखे असल्याचं म्हटलं. एकूणच या सर्व सभांमधून पवारांना टार्गेट करत जोरदार टोलेबाजी (CM Devendra Fadnavis Baramati) केली.

CM Devendra Fadnavis Baramati, पवार कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष, मात्र त्यांनी तयार केलेले पैलवानच पळून गेले : मुख्यमंत्री

बारामती : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा गड मानल्या जाणाऱ्या बारामती, इंदापूर आणि दौंडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (17 ऑक्टोबर) प्रचार सभा घेतल्या. या सभांमधून त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. राष्ट्रवादीच्या गळतीपासून ते राहुल कुल यांना मंत्रीपद देण्याच्या घोषणाही केला. त्यासोबत हर्षवर्धन पाटील, गिरीश महाजन आणि आपण त्रिशुळासारखे असल्याचं म्हटलं. एकूणच या सर्व सभांमधून पवारांना टार्गेट करत जोरदार टोलेबाजी (CM Devendra Fadnavis Baramati) केली.

“शरद पवार कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत. मात्र त्यांनी जे पैलवान तयार केले ते पळून गेले म्हणून त्यांना मैदानात उतरावं लागत आहे.” अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

“ज्याप्रमाणे शंकराचा त्रिशूळ चालला की काम झाल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे आम्ही तिघे म्हणजेच मी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे तिघेही त्रिशुळाप्रमाणे आहोत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील सर्व प्रश्न मार्गी लागल्याशिवाय सोडणार नाही.” असंही मुख्यमंत्री (CM Devendra Fadnavis Baramati) म्हणाले.

“महायुतीचे उमेदवार आमदार राहुल कुल यांना 2014 पेक्षा दुप्पट मताधिक्याने विधानसभेत पाठवा, मी त्यांना मंत्री करतो. कुल यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे असल्याने तुम्ही विकासाची काळजी करू नका. स्थानिक प्रश्न एक वर्षात मार्गी लावतो,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

एकूणच मुख्यमंत्र्यानी आज पवारांच्या गड असलेल्या बारामती, इंदापूर आणि दौंड येथे सलग तीन सभा घेतल्या. यावेळी त्यांनी तिन्ही सभांमधून पवारांवर हल्लाबोल चढवला. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री विरुद्ध राष्ट्रवादी कलगीतुरा रंगताना दिसत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *