मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवार विधानसभा लढवणार, मतदारसंघही ठरला?

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. औसा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून उभे राहण्यासाठी पवार यांनी जनसंपर्कही वाढवलाय. आतापर्यंत विविध विकासकामांसाठी 110 कोटी रुपयांचा निधी आणून पवार यांनी मतदारसंघात जनसंपर्क तयार केला आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना […]

मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवार विधानसभा लढवणार, मतदारसंघही ठरला?
Follow us
| Updated on: May 27, 2019 | 4:28 PM

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. औसा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून उभे राहण्यासाठी पवार यांनी जनसंपर्कही वाढवलाय. आतापर्यंत विविध विकासकामांसाठी 110 कोटी रुपयांचा निधी आणून पवार यांनी मतदारसंघात जनसंपर्क तयार केला आहे.

मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अभिमन्यू पवार एक पॉवरफुल नेता अशी ओळख मुख्यमंत्र्यांनी करुन दिल्याचं बोललं जातं. त्यामुळेच औसा मतदारसंघ भाजपला सोडण्यासाठी शिवसेना तयार असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय. युतीमध्ये औसा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. 2014 च्या निवडणुकीत इथून काँग्रेसचे बसवराज पाटील यांनी विजय मिळवला होता.

औसा विधानसभा मतदारसंघ

लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. काँग्रेस नेते बसवराज पाटील हे सध्या या मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 ला त्यांनी शिवसेनेच्या दिनकर माने यांचा पराभव केला होता. दिनकर माने हे औसा मतदारसंघातून आतापर्यंत 1999 आणि 2004 असे दोन वेळा आमदार राहिलेले आहेत. युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे आहे. पण अभिमन्यू पवार यांच्यासाठी शिवसेनेने ही जागा सोडण्याची तयारी दर्शवल्याचं बोललं जातंय. यानंतर आता स्थानिक पातळीवर काय घडामोडी घडतात त्याकडे लक्ष लागलंय.

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागलंय. येत्या चार महिन्यात विधानसभेसाठी निवडणूक होईल. त्यासाठी शिवसेना आणि भाजपने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत बहुतांश विधानसभा मतदारसंघांमध्ये युतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही रणनीती आखली आहे. पण लोकसभा निवडणुकीत औसा मतदारसंघाचा पूर्ण कल युतीच्या बाजूने दिसला.  औसा मतदारसंघात लोकसभेला युतीला तब्बल 53504 मतांची लीड मिळाली. शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर 1 लाख 27 हजार 566 मतांनी विजयी झाले. त्यात सर्वात मोठं योगदान औसा मतदारसंघाचं होतं.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.