AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्याचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही’, उद्धव ठाकरे यांचा घणाघात, एकनाथ शिंदे म्हणतात….

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमूठ सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला. त्यांनी अनेक मुद्द्यांवरुन शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेनंतर आता एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

'त्याचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही', उद्धव ठाकरे यांचा घणाघात, एकनाथ शिंदे म्हणतात....
Image Credit source: tv9 marathi
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 01, 2023 | 11:27 PM
Share

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर सडकून टीका केली. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे पुन्हा प्रयत्न केले जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. पण आपण मुंबईचे तुकडे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. निवडणुका जवळ आल्याने अशाप्रकारचे वक्तव्ये केले जात आहेत. मुंबईला महापाष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“कोणीही मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी जो इशारा दिला होता तोच इशारा मी आता देतोय, जो कोणी महाराष्ट्रापासून मुंबई तोडेल त्याचे तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा आमचा जाहीर इशारा आहे. पण मुंबई तोडता येत नाही म्हणून मुंबईला मारुन टाकायचं. मुंबईची हत्या करायची. हे यांच्या भांडवलदार वृत्तीचे मनसूबे आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर काय?

“मुंबई आपण सुधारतोय. आता निवडणुका आल्यात, काही लोकं म्हणत आहेत, मुंबई तोडणार. मुंबई कोण तोडणार? मुंबई तोडण्याची हिंमत कोणी करु शकत नाही. ते करता येणार नाही. हे स्वप्न कुणी पाहू नये. पण मुंबईकरांना मुंबई तोडणार म्हणून मतं मिळवण्याचा जो प्रयत्न कोणी करतोय त्यात ते यशस्वी होणार नाहीत. कारण मुंबईत आपण काम करतोय. मुंबईकर आज जाणून आहे की मुंबई बदलतेय”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“या कार्यक्रमाला हे पकडून आणलेलं पब्लिक नाही. गाड्या पाठवून आणलेलं पब्लिक नाही. हे सगळे लोक प्रेमाने कार्यक्रमासाठी आले आहेत”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला. “ते महाराष्ट्र दिनाचा आनंद व्यक्त करण्यासाठी आले आहेत, म्हणून मी तुमचं स्वागत करतो. हा एकनाथ शिंदे तुमच्या हक्काचा मुख्यमंत्री मंत्रालयात आहे. वर्षा आता सगळ्यांसाठी खुलं आहे. त्यामुळे आपण कधीही मंत्रालय, वर्षा, ठाणे, आपल्या हक्काचं आहे. हे सगळं आपलं आहे. त्यामुळे आपण कधीही येऊ शकता, भेटू शकता”, असं एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

गौतमी अदानी यांच्याबद्दल उद्धव ठाकरे आणखी काय म्हणाले?

“गौतम अदानी यांच्याबाबतीत चौकशी झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे? तुमचं काय मत आहे? तुमच्यापर्यंत विषय पोहोचलाय. माझं वेगळं मत आहे. अदानींची चौकशी करुच नका. कारण आपल्या देशाची लोकसंख्या एवढी मोठी आहे, एक माणूस मेहनत करुन एवढ्या वरती जात असेल तर त्यांचं संपूर्ण आत्मचरित्र माझ्या शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात लावा की, श्रीमंत कसं व्हायचं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“चौकशी पाहिजे की श्रीमंती पाहिजे? बरोबर ना! मी कुठे म्हणतोय ते गुन्हेगार आहेत. चौकशी करा म्हणतच नाहीत. पण निदान त्यांनी काय केलं जे कष्ट करणारी लोकं घाम गाळून सुद्धा त्यांना रोजची चिंता असते की, संध्याकाळी घरची चूल कशी लागेल. त्यांना ते मार्गदर्शक होईल ना. अदानी व्हायचंय मला. आम्ही अडाणी आहोत, अदानी व्हायचं आहे”, असा टोल उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?