CM Eknath Shinde| शिंदे- फडणवीस रात्री दिल्लीत, शहांसोबत बैठक, मंत्र्यांच्या लीस्टवर फायनल चर्चा? 25 मंत्र्यांना पहि्लया टप्प्यात शपथ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज संध्याकाळी चार वाजता दिल्लीकडे रवाना होतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्नेहभोजनाचा समारंभ सायंकाळी 7 ते 10 या वेळेत होणार आहे. त्यानंतर शिंदे फडणवीस भाजपच्या पक्ष श्रेष्ठींची भेट घेतील आणि त्यात मंत्रिमंडळाच्या लीस्टवर फायनल हात फिरवला जाईल, अशी शक्यता आहे.

CM Eknath Shinde| शिंदे- फडणवीस रात्री दिल्लीत, शहांसोबत बैठक, मंत्र्यांच्या लीस्टवर फायनल चर्चा? 25 मंत्र्यांना पहि्लया टप्प्यात शपथ?
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 2:52 PM

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची आज नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्यासोबत शिंदे-फडणवीस यांची ही बैठक असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेतून बाहेर पडलेला एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्या महायुतीतून सरकार स्थापन झालं आहे. 30 जून रोजीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली आहे. मात्र राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांसाठी तसेच सुप्रीम कोर्टातील आमदारांच्या अपात्रतेविषयी याचिका प्रलंबित असल्याने मंत्रिमंडळ विस्तार थांबल्याची चर्चा होती. मात्र आता भाजप आणि एकनाथ शिंदे गटात खातेवाटपाच्या लीस्टवर अखेरचा हात फिरवला जाणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे गटातील आमदारांना जास्तीत जास्त मंत्रिपदं मिळावीत, यासाठी मुख्यमत्री आग्रही असल्याची चर्चा आहे. यावर भाजपाची सहमती आहे की नाही, हे आगामी काळात दिसून येईल. तूर्तास तरी ही लीस्ट फायनल करण्यासाठी आज दिल्लीत महत्त्वाची बैठक असल्याचे कळतेय.

पहिल्या टप्प्यात 25 मंत्र्यांना शपथ

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन 22 दिवस उलटले तरीही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. हे दोघंच निर्णय घेतात, दोघांचंच मंत्रिमंडळ आहे, अशा आशयाच्या प्रतिक्रियाही उमटत आहेत. मात्र आता एकनाथ शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ लवकरात लवकर घोषित होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच पहिल्या टप्प्यात 25 मंत्र्यांना शपथ दिली जाईल, असंही सांगण्यात येत आहे.

दिल्लीत स्नेहभोजन

दरम्यान, मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ आज दिल्लीत स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी देशातील सर्व राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज संध्याकाळी चार वाजता दिल्लीकडे रवाना होतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्नेहभोजनाचा समारंभ सायंकाळी 7 ते 10 या वेळेत होणार आहे. त्यानंतर शिंदे फडणवीस भाजपच्या पक्ष श्रेष्ठींची भेट घेतील आणि त्यात मंत्रिमंडळाच्या लीस्टवर फायनल हात फिरवला जाईल, अशी शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.