AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : “फक्त 50 खोके? कसले बॉक्स? मिठाईचे का?” एकनाथ शिंदेंनी उडवली राऊतांची खिल्ली

फक्त 50 खोके? कसले बॉक्स? मिठाईचे का?-एकनाथ शिंदे

Eknath Shinde : फक्त 50 खोके? कसले बॉक्स? मिठाईचे का? एकनाथ शिंदेंनी उडवली राऊतांची खिल्ली
मंत्रिमंडळ विस्तारावरून जुंपली, घटनेचा दाखल देत राऊतांचं ट्विट, हे काय चाललंय?, राज्यपलांनाही सवाल
| Updated on: Jul 09, 2022 | 3:39 PM
Share

नवी दिल्ली : “फक्त 50 खोके… खोके कसले… मिठाईचे… गंमतीचा भाग जाऊ द्या. 40 अधिक 10 हे 50 आमदार लाखो लोकातून निवडून आलेले आहेत. साधा ग्रामपंचायत सदस्य पक्ष बदलत नाही. इकडे आमदार एवढ्या प्रमाणात आले”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेना खासदार संजय राऊतांची (Sanjay Raut) खिल्ली उडवली. नाशिकमध्ये बोलताना संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थ आमदारांवर टीका केली. खोकी घेतली असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याला आता एकनाथ शिंदे यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे.

राऊत काय म्हणाले होते?

बांद्यापासून चांद्यापर्यंत फाटक्या शिवसैनिकांनी या धनिकांचा पराभव केला आहे. हा इतिहास आहे. त्या इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. ते तिथे गेलेत. पण ते स्वस्थ नाहीयेत. त्यांना झोप लागत नाहीये. खोकी मिळाली म्हणून झोप लागते असं नाही. शिवसैनिकांची हाय आहे. बाळासाहेबांचा आत्मा बघतोय वरून. नुसता फोटो लावला बाळासाहेबांचा आणि आमचे म्हटल्यावर आमचे होत नाहीत. त्यांनी आशीर्वाद द्यावा लागतो. ही पवित्र भूमी आहे. त्यावर आक्रमण चालत नाही. असे आक्रमण येतात आणि जातात. आमच्यात जिगर आहे. आम्ही शिवसैनिक आहोत, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. संजय राऊत आज नाशिकमध्ये आहेत. शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांसहीत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शिवसैनिक टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद देत होते.

“सरकार स्थापन करण्यात फडणवीसांचं मोठं योगदान आहे. राज्याच्या विकासासाठी सदिच्छा भेटी घेतल्या. देशात आणि राज्यात ज्या काही घडामोडी घडल्या त्याची देशाने नोंद घेतली आहे. किंबहुना जगाने दखल घेतली आहे. पण आमची जबाबदारी वाढली आहे. सर्वांना न्याय द्यायचा आहे. आमचा एक प्लसपॉइंट आहे. मेट्रो, समृद्धी महामार्ग आणि जलयुक्त शिवार हे प्रकल्प आम्ही पुढे नेणार आहोत. राज्याला गतवैभव आणून देऊ. कारण हे प्रकल्प मधल्या काळात रखडली होती. हे सामान्य लोकांचे प्रकल्प आहेत”, असंही शिंदे म्हणाले आहेत.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.