अजितदादा महायुतीत येताच एकनाथ शिंदे कामाला लागले; आमदार, खासदारांच्या बैठकीत घेतले तीन मोठे निर्णय

राज्यातील बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सर्व कार्यक्रम रद्द केले होते. आजही त्यांनी गडचिरोलीचा दौरा रद्द केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

अजितदादा महायुतीत येताच एकनाथ शिंदे कामाला लागले; आमदार, खासदारांच्या बैठकीत घेतले तीन मोठे निर्णय
cm eknath shindeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 8:18 AM

मुंबई : अजित पवार यांच्या महायुतीतील एन्ट्रीमुळे शिंदे गट अस्वस्थ झाला आहे. अजित पवार आल्याने शिंदे गटाचे अनेक आमदार अस्वस्थ आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांची नाराजी दूर करण्याच्या कामाला लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून का आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली. यावेळी त्यांनी सर्व आमदार आणि खासदारांचं म्हणणं ऐकून घेतलं. तसेच त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला. अजित पवार यांच्या रुपाने आता शिंदे गटासमोर आव्हान निर्माण झालं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी व्हावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आतापासूनच कामाला लागले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली. यावेळी त्यांनी राजीनामा देणार असल्याचं वृत्त फेटाळून लावलं. आपल्या राजीनाम्याच्या बातम्या कुणी पेरल्या याची आपल्याला माहिती असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच अजित पवार आल्याने आपल्या गटावर काही परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री म्हणून मीच राहणार आहे. 2024नंतरही मीच मुख्यमंत्रीपदी असेल असं एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदारांना सांगितलं.

हे सुद्धा वाचा

मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करा

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदारांच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेतले आहेत. विकास कामांवर ध्यान केंद्रीत करा. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पाच आमदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दर 15 दिवसाला म्हणजे महिन्यातून दोन वेळा आमदारांना भेटण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. त्याशिवाय आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी शिवसेनेचा महामेळावा आयोजित करण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. तसेच काहीही अडचण आली तर आमदारांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं.

तीन निर्णय

१. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पाच आमदारांची निरीक्षक म्हणून नियुक्ती

२. दर 15 दिवसाला म्हणजे महिन्यातून दोनदा आमदारांना भेटणार

३. निवडणुकीवर मंथ करण्यासाठी शिवसेनेचा महामेळावा घेणार

अजित पवार युतीत ही राजकीय गरज

मी आजही मुख्यमंत्री आहे. उद्याही असणार आहे. अजित पवार सरकारमध्ये आले असले तरी सरकारवर माझं पूर्णपणे नियंत्रण आहे. अजितदादा आल्याने तुम्ही काहीही चिंता करू नका. अजित दादा युतीत येणं ही राजकीय सोय आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशिवाय राष्ट्रवादी आपल्यासोबत आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

50 आमदार निवडून आणू

दरम्यान, येत्या विधानसभा निवडणुकीत 50 आमदार निवडून आणण्याचं टार्गेट ठेवा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. तसेच 2024च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात लोकसभेच्या 45 जागा निवडून आणण्याचं शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचं टारगेट असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करू, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.