AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cm Eknath Shinde vs Shiv sena : तुम्ही आरती केली तर आम्ही पण करणार, शिंदे गटाने गणपतीच्या आरतीची घोषणा करताच ठाकरे गटही उद्या आरती करणार

ही चढाओढ आता गणपती मंदिरापर्यंत जाऊन पोहोचली आहे. कारण शिंदे गटांकडून गणपतीच्या आरतीची घोषणा करताच ठाकरे गटाकडून उद्या पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात आरती केली जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

Cm Eknath Shinde vs Shiv sena : तुम्ही आरती केली तर आम्ही पण करणार, शिंदे गटाने गणपतीच्या आरतीची घोषणा करताच ठाकरे गटही उद्या आरती करणार
तुम्ही आरती केली तर आम्ही पण करणार, शिंदे गटाने गणपतीच्या आरतीची घोषणा करताच ठाकरे गटही उद्या आरती करणारImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Jul 25, 2022 | 7:58 PM
Share

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या बंडाने आधी शिवसेनेत (Shiv sena MLA) उभे फूट पडली. राज्यातलं ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) पत्त्याच्या डावासारखं कोसळलं आणि राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचं नवं सरकार स्थापन झालं. मात्र यांना या नव्या सरकारची स्थापना झाल्यापासून प्रत्येक गोष्टीत चढाओढ दिसत आहे. सुरुवातीलाच शिंदे सरकारने ठाकरे सरकारने काढलेल्या सर्व  निविदांना स्थगिती दिली. तसेच यां निविदांची पुन्हा पडताळणी करून पुन्हा नवे निर्णय करण्यास सुरुवात केली. हा वाद फक्त मंत्रालयाच्या चौकटीपुरता आणि निर्णयानपुरताच मर्यादित राहिला नाही. तर ही चढाओढ आता गणपती मंदिरापर्यंत जाऊन पोहोचली आहे. कारण शिंदे गटांकडून गणपतीच्या आरतीची घोषणा करताच ठाकरे गटाकडून उद्या पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात आरती केली जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

ठाकरे गट उद्याच आरती करणार

पुण्यातलं श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं मंदिर देशभर प्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणाहून या ठिकाणी भाविक आरती करण्यासाठी येत असतात. पुण्यात आता दगडूशेठ गणपतीच्या महाआरतीवरून ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे यांचा गट यांच्यात चढाओढ सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती करण्याचे शिंदे गटाने जाहीर करतात, आता शिवसेने कडून दगडूशेठ गणपतीचे महाआरती करण्यात येणार आहे. त्यासाठी एक ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची आरती करण्यात येणार आहे, तर शिवसेना पदाधिकारी उद्या सकाळी दहा वाजता महाआरती करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळेस सेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महाआरती पार पडणार आहे, असेही सांगण्यात आले आहे.

ठाकरे गटाचं आरतीबाबत स्पष्टीकरण

दरम्यान उद्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणाऱ्या आरतीचा 1 ऑगस्टच्या आरतीशी काही संबंध नाही. दरवर्षी निलम गोऱ्हे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त गणपतीला मोदक अर्पण करून आरती करतात. उद्या होणारी आरती ही राजकीय नाही आणि त्याचा 1 ऑगस्टच्या आरतीशी संबंध नाही. अशी माहिती निलम गोऱ्हे यांनी उद्याच्या कार्यक्रमाबाबत दिली आहे.

धार्मिक राजकारणही वाढलं

एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडतानाच सर्वात प्रमुख कारण सांगितलं ते म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराशी घेतलेली फारकत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती करायला लागली तर मी माझं दुकान बंद करेन असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, असे सांगत शिंदे हे या दोन्ही पक्षांपासून वेगळे झाले आणि हिंदुत्वाचे विचारधारा उचलून धरणाऱ्या भाजपसोबत त्यांनी वेगळी चूल मांडली. त्यामुळे राजकारणात धर्म हा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावताना दिसून येत आहे. तसेच धार्मिक विचारधारा आणि हे राजकारण आता मंदिरांपर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे आता या महाआरतीची राज्यभर चर्चा सुरू आहे. या महाआरतीवरून पुण्याच्या राजकारणात सध्या तणाव निर्माण झाला आहे.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग