AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar: छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू येथील स्मारकाचा निधी का रोखला? मविआ सरकारच्या काळातील 2021 पर्यंतची कामे बंद करण्यावरुन अजित पवारांचा सवाल

अजित पवारांनी शिंदे सरकारच्या मविआ सरकारच्या काळातील निर्णय रद्द करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गेल्या दोन वर्षांतील निर्णय रद्द करण्याचे काही कारण नव्हते, असे सांगत त्यांनी शिंदे सरकारचा निषेध केला आहे. या कामात छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा निधीही थांबवण्यात आल्याचे सांगत त्यांनी शिंदे सरकारसमोर नवा पेच आणून ठेवला आहे.

Ajit Pawar: छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू येथील स्मारकाचा निधी का रोखला? मविआ सरकारच्या काळातील 2021 पर्यंतची कामे बंद करण्यावरुन अजित पवारांचा सवाल
छ. संभाजी महाराज स्मारक निधीवरुन वाद Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jul 25, 2022 | 5:53 PM
Share

मुंबई- ज्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) गेल्या सरकारमध्ये आमच्या सोबत काम केले आहे, त्यांनी आता मागच्या सरकारच्या कामांना स्थगिती देण्याचा दणका लावलेला आहे. असा दणका सुरु करायचं काहीच कारण नव्हंत. वास्तविक ही प्रक्रिया आहे. सरकार ये्तं असतात, सरकारं जात असतात. हे दोघं आलेत ते काय कायमचं सरकार घेऊन आलेत का, ताम्रपट घेऊन आलेत की काय. हेही पुढे कधीतरी जाणारच आहेत, त्यांनी याचा विचार करायचा की नाही. असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी केला आहे. 2021 पर्यंतची कामे बंद करणे हे बरोबर नाही. ही विकासाची, महाराष्ट्राची कामं आहेत. ही वैयक्तिक कुणाच्या दारातली किंवा घरातली कामं नव्हती. असं सांगत अजित पवारांनी शिंदे सरकारच्या (Shinde Government)मविआ सरकारच्या काळातील निर्णय रद्द करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गेल्या दोन वर्षांतील निर्णय रद्द करण्याचे काही कारण नव्हते, असे सांगत त्यांनी शिंदे सरकारचा निषेध केला आहे. या कामात छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा निधीही थांबवण्यात आल्याचे सांगत त्यांनी शिंदे सरकारसमोर नवा पेच आणून ठेवला आहे.

छत्रपती संभाजी महाराज स्मारक निधी का रोखला?

हे सगळं करत असताना छत्रपती संभाजी महाराजांचे वढू परिसरात, भव्य दिव्य स्मारक करण्यासाठी मविआ सरकारच्या काळात 265 कोटींचा आराखडा तयार केला होता. त्याचाही निधी यात रद्द झाला आहे. असे अजित पवार यांनी सांगितले आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकासाठीही निधी दिला होता. तोही थांबवल्याचे अजित पवार यांनी सांगितले. आपल्या महाराष्ट्राची काही परंपरा आहे, काही थोर व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत. सगळ्यांच्या भावना याच्याशी संबंधित आहेत. असे अजित पवार म्हणाले. या व्यक्तींनी जो इतिहास राज्याला दिला, शौर्य गाजवणारा राजा म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे आपण पाहतो. स्वराज्यरक्षक असं म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. अष्टविनायक वगैरे असे अनेक महत्त्वाचे निर्णय हे थांबवण्याचे खरे तर काही कारण नाही. असे सांगत अजित पवारांनी त्यांचा निषेध व्यक्त केला आहे. हा निधी थांबवू नये यासाठी मध्यंतरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकरता भेटलो होतो आणि त्यांना सांगितलं की, इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण महाराष्ट्रामध्ये कधी झालेलं नव्हतं. हे ताब़डतोब थांबवा, असं त्यांना सांगितलं होतं. असंही अजित पवार म्हणाले.

सहकार क्षेत्रातील निवडणुका का पुढे ढकलल्या?

सहकारातील निवडणुकाही पुढे ढकलण्याचं कारण नव्हतं. अनेक ठिकाणी 15  तारखेपर्यंत प्रचार झाला. 17 ला निवडणुका होत्या आणि त्या पुढे गेल्या. असं अजित पवारांनी सांगितलं. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होती. चार उमेदवार होते, तीन जागा निवडून द्यायच्या होत्या. ती पुण पुढे ढकलली. असे ते म्हणाले. हा निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घाई गडबडीत घेतल्याचे सरकारला सांगितले आहे. असे अजित पवारांनी सांगितले. निवडणूक प्रक्रिया सुरु असलेल्या संस्थांच्या प्रक्रिय़ा पुढे सुरु ठेवा, आणि ज्या ठिकाणी निवडणूक प्रक्रियाच सुरु झाली नसेल, त्या ठिकाणच्या निवडणुका सप्टेंबर अखेरपर्यंत पुढे ढकलायच्या असतील तर आमची काही ना नाही, असेही अजित पवारांनी सांगितले.

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.