मुख्यमंत्र्यांसह नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला

विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांची निवडणूक बिनविरोध (CM Uddhav Thackeray oath) झाली आहे. सर्व नवनिर्वाचित आमदार 18 मे रोजी दुपारी 1 वाजता शपथ घेतील. 

मुख्यमंत्र्यांसह नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला

मुंबई : विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांची निवडणूक बिनविरोध (CM Uddhav Thackeray oath) झाली आहे. मुख्यमंत्री उमेदवार असलेली निवडणूक बिनविरोध करण्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात संकेत आहेत. त्यानुसार सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने संख्याबळानुसार उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यानुसार शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचा 1 तर भाजपचे 4 असे एकूण 9 उमेदवार बिनविरोध निवडले गेले. (CM Uddhav Thackeray oath)

या सर्वांचा शपथविधी आता सोमवारी 18 मे रोजी होणार आहे. सर्व नवनिर्वाचित आमदार 18 मे रोजी दुपारी 1 वाजता विधानपरिषद सभापतींच्या उपस्थितीत विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतील.

वाचा : Uddhav Thackeray property | दोन घरं, एक फार्म हाऊस, एकही वाहन नाही, उद्धव ठाकरेंची संपत्ती किती?

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतील. विधानपरिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सर्व 9 उमेदवारांचा शपथविधी सोमवारी विधानपरिषदेत सभापतींच्या उपस्थित पार पडणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या कालवधीच्या आत ते आमदार म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या सोबतच महाविकास आघाडी आणि भाजपचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवारही शपथ घेणार आहेत.

कोणत्या पक्षाचा उमेदवार कोण?

उद्धव ठाकरे – शिवसेना निलम गोऱ्हे – शिवसेना

राजेश राठोड – काँग्रेस (Vidhan Parishad Candidature Form)

शशिकांत शिंदे – राष्ट्रवादी अमोल मिटकरी – राष्ट्रवादी

रणजितसिंह मोहिते पाटील – भाजप गोपीचंद पडळकर – भाजप प्रवीण दटके – भाजप रमेश कराड– भाजप

काँग्रेसने आग्रह सोडल्याने निवडणूक बिनविरोध

विधानपरिषदेच्या सहाव्या जागेवरुन महाविकास आघाडीतील पेच काँग्रेसच्या भूमिकेने संपला होता. काँग्रेसने सहाव्या जागेसाठी आग्रह सोडत माघार घेतल्याने आता विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. (Congress on seats of MLC Polls ). कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्वतः महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर याबाबत माहिती दिली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे 5 उमेदवार आणि भाजपचे 4 उमेदवार बिनविरोध विधान परिषदेवर निवडून जाणार असल्याचं स्पष्ट झालं.

भाजपने ऐनवेळी उमेदवार बदलला

विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध जरी होणार (BJPs  Ramesh Karad to replace Ajit Gopchhade MLC polls) असली तरी त्यामध्ये रंगत येताना दिसली. कारण भाजपने ऐनवेळी विधानपरिषदेचा उमेदवार बदलला. भाजपने डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगून, पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना उमेदवारी दिली.

संबंधित बातम्या 

भाजपचा ‘डमी’वर शिक्का, ऐनवेळी विधानपरिषद उमेदवार बदलला, पंकजा मुंडेंच्या कट्टर समर्थकला उमेदवारी!

 देवेंद्र फडणवीस यांची औरंगाबादेत गुप्त बैठक, पंकजांच्या नाराजीवर चर्चा झाल्याची शक्यता

चंद्रकांतदादांचा भाजपशी संबंध चार वर्षांचा, खडसेंचा घणाघात, अध्यक्षपद सोडून मार्गदर्शन करण्याचा टोला

Published On - 1:02 pm, Thu, 14 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI