ठाकरे-फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, शिवसेनेचा बडा मंत्री म्हणतो, महाराष्ट्राला हेच अपेक्षित!

| Updated on: Aug 28, 2021 | 3:41 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. त्या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ठाकरे-फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, शिवसेनेचा बडा मंत्री म्हणतो, महाराष्ट्राला हेच अपेक्षित!
भाजप - शिवसेना
Follow us on

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात शुक्रवारी बंद दाराआड चर्चा झाली. महाराष्ट्राच्या भल्यासाठी अशी भेट होत असेल तर महाराष्ट्राला हेच अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी अशा भेटी होणे काही गैर नाही, असं वक्तव्य शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. त्या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

त्याबाबत उदय सामंत म्हणाले, “राज्याच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी अशी भेट होत असेल तर त्यात गैर काही नाही. महाराष्ट्राला हेच अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी अशा भेटी होणे काही गैर नाही”

या भेटी नंतर युतीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे, याकडे लक्ष वेधले असता पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा प्रत्येक निर्णय शिवसैनिक म्हणून आमच्यासाठी बंधनकारक आहे, असे ते म्हणाले.

राणेंच्या अॅक्शनला रिअॅक्शन

भाजपा नेते नारायण राणे यांच्या यात्रेदरम्यान जशी अॅक्शन येईल, तशी रिअॅक्शन शिवसेनेकडून होईल, अशा शब्दात उदय सामंत यांनी इशारा दिला. ‘केंद्रातील चार मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा राज्यात सुरू आहे. पण, फक्त कोकणातील जन आशीर्वाद यात्रा गाजत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आमच्यासाठी देवासारखे आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणी आगळीक केली वा अनुद्गार काढले तर शिवसैनिक ते खपवून घेणार नाही. खरे तर जनतेचे आशीर्वाद चांगल्या कामातून मिळावे यासाठी जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करावे’ अशी खोचक टीकाही सामंत यांनी केली. शिवसेनेला कोणीही शह देऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

मुंबईत नारायण राणेंच्या घरासमोर झालेला युवासेना पदाधिकाऱ्यांचा राडा हा भावनेचा उद्रेक होता. त्यामुळे गुंडाला बढती दिली असा काही प्रकार नाही.

संबंधित बातम्या  

बाहेर शिवसेना-राणेंमध्ये राडा, फडणवीस-मुख्यमंत्र्याची बंद दाराआड चर्चा; तर्कवितर्कांना उधाण

मुख्यमंत्री आणि फडणवीसांमध्ये बंद दाराआड राणेंबाबत चर्चा? खुद्द फडणवीसांनीच केलं स्पष्ट

Video : नारायण राणेंना भर सभेत संरक्षणमंत्र्यांचा फोन, राणे म्हणाले, ‘उन्होंने हवा कर दी सर’