मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरींचा तो फोटो व्हायरल, तर्कवितर्कांना उधाण

| Updated on: Jan 07, 2021 | 10:22 PM

उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरी बैठकीदरम्यान कुठल्याशा एका विषयावर चर्चा करताना मग्न झालेले दिसून येत आहेत. (

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरींचा तो फोटो व्हायरल, तर्कवितर्कांना उधाण
नितीन गडकरी आणि उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई :  भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी  (Nitin Gadkari) हे आज मुंबईत होते. त्यांनी आज (गुरुवारी) सकाळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी गडकरींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक संपन्न झाली. या बैठकीतला उद्धव ठाकरे-नितीन गडकरींचा एक फोटो व्हायरल होतोय. उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरी बैठकीदरम्यान कुठल्याशा एका विषयावर चर्चा करताना मग्न झालेले दिसून येत आहेत. (Cm Uddhav Thackeray And nitin Gadkari Meeting)

राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनविषयक तसेच विविध परवान्यांसदर्भात मुख्यमंत्री-गडकरी यांच्यात विशेष बैठक पार पडली. या बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव संजय कुमार आदी उपस्थित होते.

गडकरींशी बैठक संपताच राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी या प्रकल्पांच्या भूसंपादनासंबंधीच्या समस्या व वन विभागाच्या परवान्यांतील अडचणी तातडीने दूर कराव्यात, असा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर गडकरी यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामाविषयी माहिती दिली. राज्यात 5500 कोटींची कामे महाराष्ट्रात मंजूर झाली आहेत, अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली. गेल्या मार्च महिन्यात राष्ट्रीय महामार्गाबाबत आढावा घेतला आहे. आता मोठ्या गॅप नंतर आता पुन्हा एकदा आढावा घेतल्याचंही गडकरींनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंशी घरगुती संबंध

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी माझे घरगुती संबंध आहेत. विकास कामांच्या दृष्टीने आजची ही महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असंही गडकरी यांनी आवर्जून सांगितलं.

गडकरी-मनोजर जोशी भेट

भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये वितुष्ट आले असले, तरी दोन्ही पक्षातील दिग्गज नेते राजकारणापलिकडची नाती जपताना दिसत आहेत. केंद्रात ‘हेवीवेट’ मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या मनात आजही ‘आपल्या मुख्यमंत्र्यां’विषयी स्नेह आहे. नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री (Manohar Joshi) यांची मुंबईत भेट घेत ऋणानुबंध कायम असल्याचं दाखवलं. मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी नितीन गडकरी यांनी सदिच्छा भेट घेतली. गडकरींनी मनोहर जोशींच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.

मनोहर जोशी हे 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होते. जोशींच्या कार्यकाळात शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये नितीन गडकरी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची धुरा होती. पीडब्ल्यूडी मंत्री म्हणून मुंबई-पुणे महामार्गाच्या विकासात नितीन गडकरी यांचा महत्त्वाचा वाटा मानला जातो. या भेटीच्या निमित्ताने गडकरी-जोशींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

हे ही वाचा

नितीन गडकरी ‘सरां’च्या भेटीला, मनोहर जोशींना वाकून नमस्कार