नितीन गडकरी ‘सरां’च्या भेटीला, मनोहर जोशींना वाकून नमस्कार

मनोहर जोशी यांच्या मुंबईतील निवासस्थानी नितीन गडकरी यांनी सदिच्छा भेट घेतली (Nitin Gadkari meets Manohar Joshi)

नितीन गडकरी 'सरां'च्या भेटीला, मनोहर जोशींना वाकून नमस्कार
नितीन गडकरींनी मनोहर जोशींची भेट घेतली
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 12:21 PM

मुंबई : भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये वितुष्ट आले असले, तरी दोन्ही पक्षातील दिग्गज नेते राजकारणापलिकडची नाती जपताना दिसत आहेत. केंद्रात ‘हेवीवेट’ मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या मनात आजही ‘आपल्या मुख्यमंत्र्यां’विषयी स्नेह आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकास मंत्री नितीनजी गडकरी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची मुंबईत भेट घेत ऋणानुबंध कायम असल्याचं दाखवलं. (Nitin Gadkari meets Manohar Joshi at Mumbai)

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी हे पक्षातर्फे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. राजकीय वर्तुळात मनोहर जोशींना प्रेम आणि आदराने ‘सर’ असे संबोधले जाते. राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून मनोहर जोशी वयोमानापरत्वे दूर झाले असले, तरी आजही दिग्गज नेत्यांशी त्यांचे घट्ट नाते आहे. मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी नितीन गडकरी यांनी सदिच्छा भेट घेतली. गडकरींनी मनोहर जोशींच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.

मनोहर जोशी हे 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होते. जोशींच्या कार्यकाळात शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये नितीन गडकरी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची धुरा होती. पीडब्ल्यूडी मंत्री म्हणून मुंबई-पुणे महामार्गाच्या विकासात नितीन गडकरी यांचा महत्त्वाचा वाटा मानला जातो. या भेटीच्या निमित्ताने गडकरी-जोशींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

मनोहर जोशी यांची कारकीर्द

1968 मध्ये ते सर्वप्रथम दादरमधून मुंबई महापालिकेत नगरसेवकपदी निवडून आले. त्यानंतर मुंबईचे महापौर, विधानपरिषद, विधानसभा आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, लोकसभा खासदार, केंद्रीय मंत्रिपद, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा अशी त्यांची राजकीय कारकीर्द बहरली. ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री तर ठरलेच, पण राज्याचे पहिले बिगर-काँग्रेसी मुख्यमंत्रीही ठरले.

मनोहर जोशी हे 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 2002-2004 या काळात जोशींनी लोकसभा अध्यक्ष म्हणून काम पाहिले.

संबंधित बातम्या :

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचे निधन

विलासकाकांच्या अंत्यदर्शनासाठी रितेश देशमुख कराडमध्ये, राजकारणापलिकडचे घनिष्ठ स्नेह

(Nitin Gadkari meets Manohar Joshi at Mumbai)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.